Rahul Shevale: राणेंनंतर आता शेवाळेंकडून आदित्य ठाकरे टार्गेट! दिशा सालियान प्रकरणी संसदेत केले गंभीर आरोप

ज्या नावानं फोन आले त्या कोडवर्डबाबत केला मोठा दावा
Aditya Thackeray latest marathi news
Aditya Thackeray latest marathi newsAditya Thackeray latest marathi news
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा त्यांनी बिहार पोलिसांच्या हवाल्यानं केला आहे. (Rahul Shevale tergeted Aditya Thackeray regarding Sushant Singh and Disha Salian suicide case)

Aditya Thackeray latest marathi news
Coronavirus: कोरोना अद्याप संपलेला नाही; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं मोठं विधान

लोकसभेत आज नियम १९३ अतंर्गत ड्रग्ज संदर्भात लघू चर्चा पार पडली. या विषयावर बोलताना शिंदे गटाचे लोकसभेतील खासदार गटनेते राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, AUचा विषय खूपच गंभीर आहे. AUचा अर्थ 'अनन्या उद्धव' असं नाही तर आदित्य उद्धव ठाकरे असंही बिहार पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांचं तपास वेगळा, बिहार पोलिसांचा तपास वेगळा तसेच सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळं लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळं याचा खुलासा झाला पाहिजे. त्यामुळं मंत्र्यांद्वारे मी जाणू इच्छितो की, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये झालेल्या मेसेजमधील चर्चेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेवाळे यांनी यावेळी केली.

Aditya Thackeray latest marathi news
Manipur Bus Accident : मणिपूरमध्ये भीषण अपघात! स्कूल बस उलटल्याने ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू, २० जखमी

नक्की प्रकरण काय आहे?

दिशा सालियाननं जून २०२० मध्ये आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या आधीच हा प्रकार घडला होता. या दोन्हीही प्रकरणात कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. राणे कुटुंबियांनी देखील याबाबत आरोप केले होते. सातत्यानं यात आदित्य ठाकरेंचं नावही घेण्यात येत होतं. पण २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सीबीआयचा एक रिपोर्ट आला होता यामध्ये म्हटलं होतं की, यामध्ये झालेले राजकीय आरोप चुकीचे आहेत. दिशाचा मृत्यू नशेच्याधुंदित १४व्या मजल्यावरुन पडून झाला होता. पण हे राजकीय आरोप थांबताना दिसत नाहीत.

हे ही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

पण आता थेट संसदेतच हा दावा केला जात आहे. रिया चक्रवर्ती आणि इतर फोनवर AU नावानं काही फोन आले होते. हे नाव म्हणजे अन्यना आणि उद्धव असं असल्याचं पोलिसांच्या रिपोर्टमध्ये आहे. पण AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं आहे. त्यामुळ या संदर्भातील प्रश्नांची उत्तर मिळायला पाहिजेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.