Bharat Jodo Nyay Yatra : राहुल यांची यात्रा गुवाहाटीबाहेर रोखली ; काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले ,पोलिसांच्या लाठीहल्ल्यामुळे तणाव

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आसाममध्ये मुख्य शहरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
rahul gandhi
rahul gandhisakal
Updated on

गुवाहाटी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आसाममध्ये मुख्य शहरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडत घोषणाबाजी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तत्पूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा यांनी वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेमुळे यात्रेला मुख्य शहरात येण्यापासून रोखण्यात येईल, असे म्हटले आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी खानापाडा येथेल गुवाहाटी चौकामध्ये मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करत राहुल यांचे स्वागत केले. आम्ही बॅरिकेड तोडत पहिली लढाई जिंकली असे प्रतिपादन काँग्रेसचे आसाम प्रभारी जितेंद्र सिंह यांनी केले. शेवटच्या टप्प्यात यात्रेने पुन्हा आसाममध्ये प्रवेश केला होता. या यात्रेचा गुरुवारपर्यंत (ता.२५) आसाममध्ये मुक्काम असेल.

‘आम्ही कायदा तोडलेला नाही’

काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘‘आम्ही बॅरिकेड्स तोडले असले तरीसुद्धा कायदा मात्र तोडलेला नाही.’’ राहुल यांनी गुवाहाटीत प्रवेश केल्यानंतर रस्त्यावरच विद्यापीठातील विद्यार्थांना उद्देशून भाषण केले. ‘‘ माझा विद्यापीठातील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता पण माझे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थी हे बाहेर आले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते हे बब्बर शेर आहेत. ते कुणालाही घाबरत नाहीत. आम्ही आसाममध्ये भाजपचा पराभव करून लवकरच सरकार स्थापन करू.’’ राहुल यांनी यावेळी पोलिसांचे देखील कौतुक केले.

rahul gandhi
Bharat Nyay Yatra: आता 'भारत न्याय यात्रा'! मणिपूर ते मुंबई सुरु होणार राहुल गांधींचा झंझावात; 'या' राज्यांमधून करणार प्रवास

आमचा लढा मुख्यमंत्र्यांविरोधात

‘‘पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली असून आमचा या पोलिसांना विरोध नाही. आमचा येथील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्र्यांना विरोध आहेत. आमची लढाई त्यांच्याविरोधात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच मला एका खासगी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापासून रोखण्यात आले होते. विद्यापीठामध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची माझी इच्छा होती.

तुमचे म्हणणे ऐकून घ्यायचे होते, तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घेण्याची आमची इच्छा होती. केंद्रीय गृहमंत्र्यांचा येथील मुख्यमंत्र्यांना फोन आला पुढे मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला दूरध्वनी करून कार्यक्रम रद्द करायला सांगितला,’’ असे राहुल यांनी नमूद केले. आसाम- मेघायलय सीमेवर बसवरून विद्यार्थ्यांना उद्देशून राहुल यांनी आज भाषण केले. ‘‘ काँग्रेसने आधीच विद्यापीठामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते पण ऐनवेळी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.