Railway: दिवाळीत सुरु केलेल्या 'या' ६० गाड्यांना मिळाली मुदत वाढ; प्रवाशांना दिलासा

Railway News
Railway News Esakal
Updated on

Railway: परतीच्या रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या ६० विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Railway News
Railway News: रेल्वे स्थानकांवर मिळणार ज्वारीचे पीठ अन् पापड!

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२१३९ सीएसएमटी-नागपूर २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत द्वि-साप्ताहिक विशेष अधिसूचित करण्यात आले होती. ती आता २८ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर-सीएसएमटी द्वि-साप्ताहिक विशेष ३० डिसेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष २८ डिसेंबर, ट्रेन क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष २९ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Railway News
Railway News: आगीच्या घटना कमी करण्यासाठी रेल्वेने हाती घेतली महत्वाची मोहीम

ट्रेन क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्हारशाह साप्ताहिक विशेष २६ डिसेंबर २०२३, ट्रेन क्रमांक ०११२८ बलहारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस २७ डिसेंबर २०२३, ट्रेन क्र. ०१४३९ पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष ३१ डिसेंबर २०२३, ट्रेन क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मुदत वाढवण्यात आलेल्या ६० विशेष गाड्यांचे सविस्तर आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Railway News
South Central Railway : रेल्वे स्थानकांवर मिळणार ज्वारीचे पीठ अन् पापड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.