नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. या कालावधीत रेल्वेही बंद होती. या कालावधीत ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या पासची वैधता संपली आहे त्यांना आता मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या पासेससाठी वैधतेचा कालावधी वेगळा असणार आहे. काल (ता. १५) यासंबंधी रेल्वे प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. रेल्वेच्या सर्व झोन्सच्या जीएमना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१९ पर्यंत जारी करण्यात आलेल्या पासेसची वैधता जुलै २०२० पर्यंत राहणार आहे. तर याचप्रमाणे डिसेंबरमधील पास ऑगस्टपर्यंत वैध असणार आहेत.
दुसरीकडे जानेवारीदरम्यान देण्यात आलेल्या पासची वैधता १५ सप्टेंबरपर्यंत आणि फेब्रुवारीदरम्यान देण्यात आलेल्या पासची वैधता १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मार्चदरम्यान देण्यात आलेल्या पासची वैधता १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याव्यतिरिक्तही कर्मचाऱ्यांना अन्य सुट देण्यात आली आहे. काही अटींच्या आधारावर ट्रान्सफर पास, किट पास, सेटलमेंट पास, स्कूल पास आणि स्पेशल पासची वैधतादेखील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तारखेच्या स्लॅबनुसार वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाउनमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आलेल्या पास अथवा पीटीओचा वापर करता आला नव्हता. तसंच याची वैधता वाढवण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर या पासेसची वैधता वाढवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.