नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या (Corona Wave) लाटेची शक्यता बघता रेल्वेकडून पुन्हा एकदा जनजागृती करण्यास सुरू करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रवासादरम्यान पुन्हा एकदा मास्क (Face Mask) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय कोविडसंबंधित मार्गदर्शन (Covid SoP) तत्त्वांचेदेखील पालन करणे बंधनकारक असणारआहे. याबाबत सोमवारी कार्यकारी संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) नीरज शर्मा यांनी पत्र जारी केले आहे. (Face Mask Mandatory During Railway Travel)
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना कोविड SOP पाळण्याचे निर्देश दिले असून, नीरज शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, प्रवाशांना मास्क घातल्यानंतरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यशिवाय ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत झालेली घट लक्षात घेता इतर गोष्टींप्रमाणे रेल्वेची सेवादेखील पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. तसेच अनेक निर्बंधदेखील रेल्वेतर्फे शिथील करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी मास्कसक्ती नसल्याने प्रवासादरम्यान मास्क परिधान करणे बंद केले होते.
मात्र, आता पुन्हा देशातील काही भागात कोरोनाचे (Corona) रूग्ण वाढू लागले आहे. तसेच आगामी काळात कोरोनोची चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आता रेल्वेने पुन्हा स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना आणि ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. (India Corona Update)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.