Railway Minister on Andhra Train Collision: 'ड्रायव्हर मोबाईलवर क्रिकेट पाहत होता', आंध्र प्रदेशात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर.. 14 जणांनी गमावला होता जीव

Railway Minister on Andhra Train Collision: आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक जण जखमीही झाले होता.
Railway Minister on Andhra Train Collision
Railway Minister on Andhra Train CollisionEsakal
Updated on

Railway Minister on Andhra Train Collision: आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील 29 ऑक्टोबर 2023 रोजी अलमांडा-कंकटापल्लीजवळ येथे एका पॅसेंजर ट्रेनची दुसर्‍या पॅसेंजर ट्रेनला धडकली होती. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. दोन गाड्यांमधील टक्कर झाल्यामुळे झालेल्या या भीषण अपघाताचे कारण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

एका ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक त्यांच्या फोनवर क्रिकेटचा सामना पाहत होते. अशा स्थितीत निष्काळजीपणामुळे 29 ऑक्टोबर 2023 रोजी दोन गाड्यांमध्ये धडक झाली आणि या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.

Railway Minister on Andhra Train Collision
Train Accident in Andhra Pradesh: विजयनगरममध्ये भीषण रेल्वे अपघात, दोन पॅसेंजर ट्रेनमध्ये धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता रायगडा पॅसेंजर ट्रेनने आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम पलासा ट्रेनला मागून धडक दिली. या अपघातात 50 हून अधिक जण जखमीही झाले होते.

रेल्वे मंत्री यावेळी बोलताना म्हणाले, आंध्र प्रदेशात नुकतीच ही भीषण घटना घडली, कारण ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक दोघेही क्रिकेट सामना पाहत होते आणि त्यांचे लक्ष विचलित झाले. आता आम्ही अशा कोणत्याही विचलित होऊ नयेत अशा यंत्रणा बसवत आहोत की ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक दोघेही ट्रेन चालवण्यावर लक्ष केंद्रित करतील.

Railway Minister on Andhra Train Collision
"पॅसेंजर ट्रेन रुळावर उभी होती त्याचवेळी मागून दुसरी ट्रेन आली अन्..."; आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, 6 ठार, 25 जखमी

"आम्ही सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत राहू. आम्ही प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही त्यावर उपाय शोधतो," असेही ते पुढे म्हणाले.

रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ने केलेला तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नसला तरी, अपघाताच्या एका दिवसानंतर रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत रायगडा पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालक या दोघांना भीषण अपघातासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.