नक्षलवाद्यांनी लोहमार्गाचा भाग स्फोटात उडवला; हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

दक्षिण रेल्वेच्या महादेवसाल आणि पोसोईटा या स्थानकांदरम्यान ही घटना घडली. लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
Railway track between Manoharpur and Goilkera was blown up by Naxals
Railway track between Manoharpur and Goilkera was blown up by Naxals
Updated on

छैबासा (झारखंड) : झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात बंदी घातलेल्या भाकप (माओवादी) संघटनेच्या नक्षलवाद्यांनी लोहमार्गाचा भाग स्फोटात उडवून दिला. त्यामुळे, हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. किमान १३ रेल्वे रद्द कराव्या लागल्या तसेच एका रेल्वेचा मार्ग बदलावा लागला.

दक्षिण रेल्वेच्या महादेवसाल आणि पोसोईटा या स्थानकांदरम्यान ही घटना घडली. लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

गोयलकेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम सिंगभूमचे पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी रांचीपासून अंदाजे 150 किमी अंतरावर असलेल्या गोयलकेरा आणि पोसोईटा रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

Railway track between Manoharpur and Goilkera was blown up by Naxals
Bajrang Punia : मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत पाठवतोय... बजरंग पुनियानं उचललं टोकाचं पाऊल

“परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सकाळपासून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच रेल्वे सेवा पुन्हा सुरू होईल. माओवाद्यांनी परिसरात बॅनर आणि पोस्टर्सही लावले,” पीटीआयने शेखरच्या हवाल्याने सांगितले. (Latest Marathi News)

Railway track between Manoharpur and Goilkera was blown up by Naxals
Loksabha Election 2024: राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजप जाहीर करणार लोकसभेसाठी पहिली यादी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.