Kumbh Mela 2024 : कुंभमेळ्यासाठी रेल्वेची ‘पर्वणी’; विशेष ९९२ गाड्या सोडणार; ९९३ कोटींची तरतूद

प्रयागराज येथे पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनच्यावतीने विशेष ९९२ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Railways Special 992 trains for Kumbh Mela 2024 993 crore provision
Railways Special 992 trains for Kumbh Mela 2024 993 crore provisionsakal
Updated on

नवी दिल्ली : प्रयागराज येथे पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनच्यावतीने विशेष ९९२ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वेस्थानकांसह विविध रेल्वेशी निगडित विविध ठिकाणांच्या नूतनीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ९९३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी रेल्वेमंत्रालयाच्या वतीने प्रयागराज विभाग आणि आसपासच्या विभागातील रेल्वेमार्गांचे दुपदरीकरणदेखील वेगात सुरू आहे. यासाठी सुमारे तीन हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रायगराज येथे १२ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सुमारे ३० कोटी ते ५० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.

विशेष ९९२ रेल्वे गाड्यांसह विविध शहरातून नियमित येणाऱ्या सहा हजार ५८० रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाच्या योग्य ती उपाययोजना आखली जात आहे. त्याचप्रमाणे गरज पडल्यास येथील रेल्वेची संख्या आणखीही वाढविण्यात येईल असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रेल्वे मंत्र्यांनी घेतली बैठक

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंग बिट्टू आणि व्ही. सोमण्णा यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे वैष्णव हे उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि ईशान्य रेल्वे या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे नियमित बैठका घेत आहेत, अशी माहितीही रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.