रेल्वेतली पत्र्याची पेटी जाणार अन् ट्रॉली बॅग येणार; लोको पायलट अन् गार्ड यांच्यासाठी रेल्वे मंडळाने दिले 'हे' आदेश

Loco Pilot : रेल्वेच्या लोको पायलट आणि गार्ड यांना त्यांचे कपडे, जेवणाचा डबा असे खासगी सामान ठेवण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजाच्या सामानासाठी पत्र्याची पेटी असते
Railways to replace iron trunks of loco pilots guards with trolley bags marathi news
Railways to replace iron trunks of loco pilots guards with trolley bags marathi news
Updated on

नवी दिल्ली, ता. २५ (पीटीआय) : लोको पायलट आणि गार्ड यांना यापुढे त्यांचे खासगी सामान आणि सरकारी साहित्य वाहून नेण्यासाठी लोखंडी पत्र्याच्या पेट्या वापरण्याची गरज पडणार नाही, अशी शक्यता आहे. या सर्वांना ट्रॉली बॅगा पुरविण्याचे आदेश रेल्वे मंडळाने सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

रेल्वेच्या लोको पायलट आणि गार्ड यांना त्यांचे कपडे, जेवणाचा डबा असे खासगी सामान ठेवण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजाच्या सामानासाठी पत्र्याची पेटी असते. त्यांना ही पेटी उचलून न्यावी लागते. आता मात्र त्यांचा हा त्रास वाचविण्यासाठी ट्रॉली बॅग पुरविण्याची विनंती रेल्वे मंडळाने सर्व विभागाच्या प्रमुखांना केली आहे. वास्तविक, याबाबतचा निर्णय २००६ मध्येच झाला होता. त्यानंतर एका वर्षाने त्यावर चर्चा होऊन प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. मात्र, लोको पायलट आणि गार्ड यांनीच विरोध केल्याने त्याची अंमलबजावणी ११ वर्षे लांबणीवर पडली.

Railways to replace iron trunks of loco pilots guards with trolley bags marathi news
Mumbai Rain Alert : पावसाने आज केली दुर्दशा... मुंबईत किती दिवस राहाणार ही परिस्थिती? जाणून घ्या अंदाज

२०१८ मध्ये रेल्वे मंडळाने पुन्हा एकदा याबाबत निर्णय घेताना उत्तर रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे या विभागांमध्ये योजना राबविण्याचे ठरविले. विविध चाचण्या घेऊन दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारीमध्ये ट्रॉली पुरविण्याबाबत आदेश काढण्यात आला. विभागांनी स्वत: ट्रॉली बॅगा खरेदी कराव्यात किंवा कर्मचाऱ्यांना दर तीन वर्षांनी पाच हजार रुपयांपर्यंत निधी पुरवून बॅगा खरेदी करण्यास सांगावे, असेही यावेळी सांगण्यात आले. मात्र, काही जणांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित केल्याने पुन्हा एकदा अंमलबजावणी रखडली. यंदा पुन्हा एकदा हा आदेश काढण्यात आला आहे.

Railways to replace iron trunks of loco pilots guards with trolley bags marathi news
Google Maps : फ्लायओव्हर घ्यायचा की सोडायचा? ते मेट्रोचं तिकीट; 'गुगल मॅप्स'ने भारतीयांसाठी लाँच 'हे' सहा भन्नाट फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.