Raj Thackeray : 'कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् शरयू नदी हसली!'; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा आज (22 जानेवारी) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
Raj Thackeray On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha
Raj Thackeray On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha
Updated on

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा आज (22 जानेवारी) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. या सोहळ्याकडे देशासह जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले होते. या सोहळा संपन्न होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आज कारसेवकांचे आत्मे सुखावले असे म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनेक वर्षांपासून वाट पाहिली जात होती. या सोहळ्यासाठी मोठअया प्रमाणात तयारी देखील करण्यात आली. देश-विदेशातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आले होते. अखेर आज हा सोहळा पार पडला आहे.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!" अशी पोस्ट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये केली आहे. सोबत रामलल्लांच्या मूर्तीची एक व्हिडीओ क्लीप देखील राज ठाकरे यांनी शेअर केली आहे.

Raj Thackeray On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha
PM Modi In Ayodhya : ना बायकोसोबत रामाप्रमाणे वागले ना रामराज्य चालवलं; भाजपच्या बड्या नेत्याचा मोदींना घरचा आहेर

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सुरूवात गणेशपुजनाने करण्यात आली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर दिग्गजांनी हजेरी लावली.

या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.  तर देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले होते.

Raj Thackeray On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha
Congress Former MP Joining BJP : काँग्रेसला राज्यात पुन्हा मोठा धक्का! देवरांनंतर दुसरा बडा नेता भाजपच्या वाटेवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.