Rajasthan : आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ५०० रुपयांत सिलेंडर; शिंदे सरकारकडे लक्ष

ashok gehlot
ashok gehlot
Updated on

अलवर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांना गॅस घेता यावा, यासाठी उज्ज्वला योजना आणली होती. त्यामुळे घरोघरी गॅस पोहोचला. मात्र गॅस सिलेंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उज्ज्वला आणि बीपीएल धारकांना सिंलेडर विकत घेणे अवघड झालं आहे. मात्र काँग्रेसशासित राजस्थान राज्याने गॅस सिलेंडरच्या किंमती निम्म्यावर आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबत काही निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच कारण म्हणजे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. (ashok gehlot news in Marathi)

ashok gehlot
Nagpur : नागपूर हादरलं! गृहमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुहेरी हत्याकांड

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले की, 1 एप्रिलपासून राज्यातील बीपीएल आणि उज्ज्वला योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांना 500 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर मिळतील. गहलोत सोमवारी अलवरमधील मलाखेडा येथे जाहीर सभेत बोलत होते.

ashok gehlot
Winter Session : अजित पवारांच्या 'त्या' प्रश्नाला सभागृहातच उत्तर देणार; फडणवीसांचं सूचक विधान

अशोक गहलोत यांच्या सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गोरगरिबांना मोठा दिलासा दिला आहे. ते म्हणाले की, देशात महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या नावाने नाटक केले. सध्या गॅस सिलिंडर १०३६ रुपयांना मिळतो. पुढील महिन्यात बजेट सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीपीएल-उज्ज्वाा योजनेच्या कक्षेत येणाऱ्या लोकांचा अभ्यास आम्ही करत आहोत, असे ते म्हणाले. पण मी जाहीर करतो की, १ एप्रिलपासून बीपीएल आणि उज्ज्वला योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना सिलिंडर ५०० रुपयांत उपलब्ध करून दिले जाईल. सध्या या सिलिंडरची किंमत 1040 रुपयांच्या आसपास आहे.

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा राजस्थानात आहे. त्यातच गेहलोत यांनी ही घोषणा केली आहे. पुढील वर्षी राजस्थानमध्ये निवडणुका आहे. त्यामुळे गेहलोत यांची घोषणा काँग्रेसला फायदेशी ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.