Rajasthan Assembly Election Results 2023 : मायावतींच्या BSP नं राजस्थानात किती जागांवर मारली बाजी? कोण होते उमेदवार?

राज्यात भाजपनं (BJP) जोरदार मुसंडी मारत 115 जागा जिंकल्या (आतापर्यंतच्या कलानुसार) आहेत.
Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Assembly Election Results 2023esakal
Updated on
Summary

जसवंत सिंग गुर्जर यांनी बारी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे.

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र आता स्पष्ट होतं आहे. राज्यात भाजपनं (BJP) जोरदार मुसंडी मारत 115 जागा जिंकल्या (आतापर्यंतच्या कलानुसार) आहेत.

दरम्यान, मतमोजणी सुरू असतानाच राजस्थान निवडणुकीत बसपानं (BSP) दोन जागा जिंकल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मायावतींच्या (Mayawati) बसपानं बारी आणि सादुलपूर या जागा जिंकल्या आहेत. बारीमधून बसपाचे जसवंत सिंग गुर्जर विजयी झाले आहेत, तर सादुलपूरमधून बसपाचे मनोज कुमार विजयी झाले आहेत.

जसवंत सिंग गुर्जर यांनी बारी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे. जसवंत सिंग गुर्जर यांनी भाजपच्या गिरराज सिंह मलिंगा यांचा 27424 मतांनी पराभव केला. गिरराज सिंह मलिंगा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तरीही बसपाच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. बसपाचे उमेदवार जसवंत सिंग गुर्जर यांना 106060 मतं मिळाली.

Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Congress : 'पेपर लीक, लाल डायरी,भ्रष्टाचाराचे आरोप.. ' पाच वर्षांपूर्वी मजबूत असलेली काँग्रेस अशी कमकुवत होत गेली

मनोज कुमार यांनी सादुलपूरची जागा 2574 मतांनी जिंकली आहे. मनोज कुमार यांनी काँग्रेसच्या कृष्णा पुनिया यांचा पराभव केला असून, कृष्णा पुनिया यांना 61794 मतं मिळाली होती. या जागेवर भाजपच्या उमेदवार सुमित्रा पुनिया यांना 59429 मतं मिळाली आहेत.

जसवंत सिंग गुर्जर यांनी भाजप सोडून बसपामध्ये प्रवेश केला असून त्यांनी विजयाची नोंद केली आहे, असं मायावतींनी सांगितलं आहे. जसवंत सिंग गुर्जर हे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर बारी मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.

Rajasthan Assembly Election Results 2023
BJP Success in Assembly Election : भाजप पराभूत का होत नाही? जोरदार विजयाची 5 कारणे अन् विश्लेषण

अन् मायावतींचा डाव यशस्वी झाला

2023 च्या निवडणुकीपूर्वी बसपानं भाजप नेते जसवंत सिंग गुर्जर यांना आपल्या गोटात घेतलं आणि त्यांनी भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकानं पराभव केला. बारी विधानसभेच्या जागेवर मायावतींचा हा डाव यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. मायावतींनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रचार केला होता. मध्य प्रदेशात बसपाची गोंडवाना गणतंत्र पार्टी या पक्षासोबत युती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.