Rajasthan Election: 'आधी एक पाय तोडण्याचा विचार केला, मात्र आता...' भाजप नेत्याची धमकी व्हायरल; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

भाजप नेत्याची धमकी व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
Rajasthan Election
Rajasthan ElectionEsakal
Updated on

राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्या आहे, अगदी काही दिवसांवर विधानसभा निवडणूका आल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी एकमेकांवर टीका आणि हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमने-सामने असणार आहे. या दोन पक्षांमध्ये कांटे की टक्कर असणार आहे. प्रचाराच्या दरम्यान भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आपापसात जुंपली आहे.

बारां जिल्ह्याच्या अंता या मतदारसंघातून भाजपने कंवरलाल मीणा यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून प्रमोद जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कंवरलाल मीणा सध्या मतदार संघात सक्रिय झाले असून ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. कुंवरलाल विधानसभा मतदारसंघात जाऊन जनतेकडून मत देण्याचे आवाहन करत आहेत.

Rajasthan Election
Rajasthan Election : २०० जागा लढण्याचा दावा करणाऱ्या 'आप'ला मिळाले नाहीत उमेदवार; राजस्थानमध्ये ९ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात

अशाच एका सभेतील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचे दोन्ही पाय तोडण्याबाबत बोलत असताना दिसत आहेत. यावेळी ते स्वतः आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले भाजपचे इतर नेतेही त्यांच्या वक्तव्यावर हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

दोन्ही पाय तोडावे लागतील

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाजप उमेदवार कंवरलाल मीणा म्हणतात की, "त्यांच्यावर (प्रमोद जैन) नक्कीच उपाय केले जातील हे निश्चित आहे आणि आता एक पाय मोडण्याचा विचार मी सुरुवातीला केला होता, पण खूप लोकांची झुंबड उडाली आहे, मला गाडीत बसताना वाटले की आता दोन्ही पाय मोडावे लागतील."

'मी जबाबदारी घेईन, घाबरू नका'

त्याचवेळी भाजपचे उमेदवार आपल्या भाषणादरम्यान बोलताना म्हणाले की, "छत्तीस समाजाचे लोक एकत्र येतात, निवडणुकीच्या वेळी काही ना काही वाद होतात. म्हणून मी देवासमोर म्हणतो, सर्व जबाबदारी माझी आहे, घाबरू नका, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काम करताना आमच्या कार्यकर्त्यांनी काही चूक केली तर आम्ही कायद्याच्या पुस्तकाकडे बघणार नाही, आम्ही एकतर्फी बोलू."

२५ नोव्हेंबरला या भागात एकात टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल समोर येईल. या निवडणुकीवेळी राजस्थानची जनता राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला संधी देणार की पुन्हा एकदा सत्तापालट होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.