Rajasthan Election: खिशात रुपयाही नाही! राजस्थान निवडणुकीतले 'हे' आठ उमेदवार आहेत सर्वात गरीब

आज राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज (२५ नोव्हेंबर) मतदान होत आहे. यावेळी सर्व पक्षांचे मिळून 1862 उमेदवार रिंगणात आहेत.
Voting
VotingSakal
Updated on

आज राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज (२५ नोव्हेंबर) मतदान होत आहे. यावेळी सर्व पक्षांचे मिळून 1862 उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानसह अन्य चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.(Latest Marathi News)

दरम्यान या निवडणुकीमध्ये रिंगणात असलेले उमेदवार चांगलेच चर्चेत आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्षाधीश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर दुसरीकडे एक रुपयाचीही मालमत्ता नाही असेही उमेदवार आहेत. एडीआरच्या अहवालानुसार या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात याबाबतची माहिती दिली आहे. अशाच काही उमेदवारांबद्दल जाणून घेऊया. (Marathi Tajya Batmya)

Voting
Rajasthan Election Voting : राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान; 1,863 उमेदवार रिंगणात, भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'

१. बनवारीलाल शर्मा – बनवारीलाल शर्मा हे अलवर जिल्ह्यातील थानागाजी मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले आहे.

२. हेमंत शर्मा - इंडियन पीपल्स ग्रीन पार्टीचे अधिवक्ता हेमंत शर्मा, अलवर जिल्ह्यातील बेहरोर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्यांचीही संपत्ती शून्य आहे.

३. दीपक कुमार मीना - सम्राट मिहीर भोज समाज पक्षाचे दीपक कुमार मीना सवाईमोधपूर जिल्ह्यातील सवाई मोधूपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तसेच त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही.

Voting
Rajasthan Election: सरदारपुरात गेहलोतच ‘सरदार’, भाजपकडून विरोधात प्रभावी उमेदवार नाही

४. बद्रीलाल - आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) बद्रीलाल झालेवाड जिल्ह्यातील एससी आरक्षित डाग जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शून्य संपत्ती जाहीर केली आहे.

५. नाहर सिंह - नाहर सिंह गंगानगर जिल्ह्यातील रायसिंगनगर SC आरक्षित जागेवरून मजदूर किसान अकाली दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तसेच त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही.

६. कन्हैयालाल - कन्हैयालाल बिकानेर जिल्ह्यातील नोखा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे एक रुपयाचीही संपत्ती नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

७. वेदप्रकाश यादव - एक रुपयाचीही संपत्ती नसल्याचा दावा करणारे वेदप्रकाश यादव अलवर जिल्ह्यातील मुंडावार मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Voting
Rajasthan Election: राजस्थानमधील प्रचाराची सांगता; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, या निवडणुकीत जनता कोणाला देणार संधी

८. पुरुषोत्तम भाटी – पुरुषोत्तम भाटी अजमेर जिल्ह्यातील बेवार भागातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे शून्य रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

या उमेदवारांकडे आहे 500 रुपयांचे मालक

दुसरीकडे, असे काही उमेदवार आहेत ज्यांनी प्रतिज्ञापत्रात 500 रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. बहुजन शोषित समाज संघर्ष समता पक्षाच्या कुसुम लता हिंडौन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर बहुजन मुक्ती पार्टीचे चंद्र कुमार चित्तौडगड जिल्ह्यातील निंबाहेरा भागातून निवडणूक लढवत आहेत. या दोघांनीही त्यांच्याकडे एकूण ५०० रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.