Rajasthan Election Result 2023
Rajasthan Election Result 2023Esakal

Rajasthan Election Result 2023: राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचं काय चुकलं? काय आहेत काँग्रेसच्या पराभवाची कारणे, वाचा सविस्तर

राजस्थान निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस पराभवासह सत्तेतून बाहेर पडल्याचे दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाची कारणे काय?
Published on

राजस्थान निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, विरोधी भारतीय जनता पक्ष (भाजप) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप 98 जागांवर आघाडीवर आहे. ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी काँग्रेस 84 जागांवर पुढे आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने काँग्रेसवर 17 जागांवर आघाडी घेतली आहे. ताज्या ट्रेंडवरून राज्यातील काँग्रेस सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. या पराभवाची कारण काय? काँग्रेस हरत असेल तर त्याची पाच कारणे कोणती?(Latest Marathi News)

१- गटबाजी

निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस गटबाजीशी झुंजताना दिसत होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचाही कार्यकर्त्यांवर परिणाम होऊन जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. मात्र, निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेते आम्ही एकत्र आहोत, असा संदेश देताना दिसले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेसने गटबाजीचा सामना केला, तर भाजपने हा संघर्ष अधिक चांगल्या पद्धतीने हाताळला. दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली नाही, मात्र काँग्रेसकडून अशोक गेहलोत हे अघोषित मुख्यमंत्री चेहरा होते. त्याचवेळी, गटबाजीवर मात करण्यासाठी भाजपने वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करणेच टाळले नाही तर बड्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्याचा परिणाम असा झाला की, नेत्यांनी आपली विश्वासार्हता वाचवण्यासाठी त्या जागेवर दबाव आणला आणि त्याचा सकारात्मक परिणाम आसपासच्या जागांवरही झाला.(Latest Marathi News)

Rajasthan Election Result 2023
Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

२- निवडणूक मोदी विरुद्ध गेहलोत अशी झाली

मोदी विरुद्ध गेहलोत अशी राजस्थानची निवडणूकही काँग्रेसला महागात पडली. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याने काँग्रेसच्या जात जनगणनेच्या हालचालीची धारही बोथट केली. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये मोठ्या सभा निवडणूक रॅली घेतल्या, तर काँग्रेसच्या प्रचाराचा भार सीएम गेहलोत यांच्या खांद्यावर अधिक असल्याचे दिसून आले. निवडणूक पूर्णपणे मोदी विरुद्ध गेहलोत अशी झाली आणि भाजपलाही याचा फायदा झाला. 

Rajasthan Election Result 2023
Madhya Pradesh CM candidate for BJP : मध्यप्रदेशमध्ये येणार का 'शिंदे सरकार', कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री?

३- कन्हैयालाल खून प्रकरणाचा मोठा परिणाम

राजस्थान निवडणुकीत भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा बराच उचलून धरला. भाजपची ही रणनीतीही प्रभावी ठरताना दिसत आहे. मारवाड भागात उदयपूर येते. जो मेवाड जिंकतो तो राजस्थान जिंकतो असे राजस्थानच्या राजकारणात म्हटले जाते. भाजपला विजय मिळताना दिसत असेल, तर कन्हैयालाल खून प्रकरणासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही त्यामागे महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.

Rajasthan Election Result 2023
Rajasthan Election Result: अजूनही काँग्रेस करू शकते कमबॅक? या 15 जागा ठरणार किंगमेकर

४- पेपर फुटीचे प्रकरण

अशोक गेहलोत यांच्या सरकारने निवडणुकीच्या वर्षात एकापाठोपाठ एक नव्या योजना आखल्या. चिरंजीवी योजनेंतर्गत त्यांनी आरोग्य विम्याची मर्यादा ५० लाखांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले. स्वस्त गॅस सिलिंडरसह पेपर लीक, लाल डायरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसवर भारी पडले.

५- बंडखोरांमुळे मोठा फटका

काँग्रेसच्या पराभवामागे बंडखोर हेही मोठे कारण मानले जात आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहींनी भाजप आणि इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूकही लढवली. या बंडखोरांनी काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. याउलट भाजपने प्रत्येक बंडखोराला मनवण्याची जबाबदारी बड्या नेत्यांवर दिली आणि त्यांना मनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अनेक बंडखोरांनी सहमती दर्शवल्याने भाजपला याचा फायदा होताना दिसत आहे.

Rajasthan Election Result 2023
Electronic Voting Machine : ईव्हीएम मशिनचा वापर सर्वात आधी कोणत्या राज्यात करण्यात आला होता? जाणून घ्या EVM चा रंजक इतिहास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.