Rajasthan Election: राजस्थान विधानसभेच्या रिंगणात 1800 हून अधिक उमेदवार; महिला उमेदवारांची संख्या किती?

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (25 नोव्हेंबर) मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
Rajasthan Election
Rajasthan ElectionEsakal
Updated on

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (25 नोव्हेंबर) मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 200 जागा आहेत, मात्र 199 जागांवर मतदान होत आहे. आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळीही ते याच जागेवरून निवडणूक लढवत होते. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांचा प्रचार गुरुवारी (२३ नोव्हेंबर) थांबला होता. या निवडणुकीत अनेक बडे नेते रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांचा डेटा शेअर केला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानच्या निवडणूक लढाईत एकूण 1875 उमेदवार लढत आहेत.(Latest Marathi News)

महिला उमेदवारांची संख्या किती?

निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2365 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 490 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकूण 1875 उमेदवारांपैकी 1692 पुरुष आणि 183 महिला उमेदवार आहेत. विभागानुसार, 2018 च्या निवडणुकीत 2294 उमेदवार होते, त्यापैकी 2105 पुरुष आणि 189 महिला उमेदवार होत्या.

Rajasthan Election
Rajasthan Election: भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही; उलट काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात वापरली ही स्ट्रॅटजी

निवडणूक आणि निकालाची तारीख

राजस्थानमध्ये आज 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याच वेळी, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामसह 3 डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील. काँग्रेस अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे, तर भाजपने अद्याप कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलेला नाही.(Latest Marathi News)

राजस्थानमध्ये मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. 1993 मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून येथे दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. या काळात केवळ काँग्रेस आणि भाजपचीच सरकारे स्थापन झाली आहेत. त्यामुळे यंदाही हीच परंपरा कायम राहिल्यास सत्ता भाजपच्या हाती येईल, अशी आशा भाजप नेत्यांना आहे. त्याचबरोबर जवळपास तीन दशकांपासून चालत आलेली ही परंपरा यावेळी बदलेल, अशी आशा काँग्रेसला आहे.

Rajasthan Election
Rajasthan Election: खिशात रुपयाही नाही! राजस्थान निवडणुकीतले 'हे' आठ उमेदवार आहेत सर्वात गरीब

काँग्रेस आणि भाजपने अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. सात हमीभावांची घोषणा करून काँग्रेसने अशोक गेहलोत सरकारची कामे आणि त्याद्वारे चालवलेल्या योजना आणि कार्यक्रमांकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गेहलोत सरकारला आपल्या निवडणूक प्रचारात महिलांवरील गुन्हे, लांगुलचालन, भ्रष्टाचार आणि पेपर लीक या मुद्द्यांवरून कोंडीत पकडले आहे.

भाजपने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर काँग्रेसने 2018 प्रमाणेच आपला मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दल (RLD) साठी एक जागा सोडली आहे. आरएलडीचे विद्यमान आमदार सुभाष गर्ग भरतपूरमधून निवडणूक लढवत आहेत.

Rajasthan Election
Rajasthan Election: ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का! अनेकांनी धरली भाजपची वाट; प्रभावी नेत्यांनाच डावललं

सत्ताधारी काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी, मंत्री शांती धारिवाल, बीडी कल्ला, भंवर सिंग भाटी, सालेह मोहम्मद, ममता भूपेश, प्रताप सिंग खाचरियावास आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा समावेश आहे.(Latest Marathi News)

त्याचबरोबर भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, विरोधी पक्ष उपनेते सतीश पुनिया, खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड आणि बाबा बालकनाथ आदी उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.