ashok gehlot
ashok gehlotSakal

राहुल गांधींनी काँग्रेसची सर्व सूत्रे हाती घ्यावीत- अशोक गेहलोत

इंदिरा गांधींनी जीव दिला पण खलिस्तान होऊ दिले नाही.
Published on

निवडणूकी दरम्यान धर्म आघाडीवर असतो तर महागाई आणि नोकऱ्यांचे मुद्दे मागे पडतात. भाजप (BJP) ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. म्हणूनच सोशल मीडियावर काँग्रेसचा मुस्लिम पक्ष असा प्रचार त्यांनी केला आहे. देशाची अखंडता आणि एकता राखणे या मार्गावर काॅग्रेस चालतो भाजप सारखे धर्माचे राजकारण करत नाही असा घणाघात राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी केला.

निवडणुकीत हार जित होत असते. ती मान्यच करावी लागते. यासाठी राजकारण करणे गरजेचे नाही. मात्र भाजप धर्माचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करत आहे. आज ना उद्या देशातील जनतेला हे नक्कीच समजेल. इंदिरा गांधींनी जीव दिला पण खलिस्तान होऊ दिले नाही. याउलट भाजपची भुमिका आहे असेही ते म्हणाले.

ashok gehlot
फडणवीस प्रकरणी भाजप आक्रमक; भुजबळ म्हणाले ही तर गोबेल्स नीति...

पंजाब विधानसभा निवडणुकीत काॅंग्रसचा पराभव झाला. यासंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले, २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये एकी होती त्यामुळे त्यावेळी आम्ही जिंकलो. मात्र पंजाबमध्ये अंतर्गत संघर्षामुळे पराभव झाला. चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेस बाजी मारेल असा विश्वास होता अशी नाराजीही यावेळी व्यक्त झाली.

ashok gehlot
…म्हणून आघाडीचा बीपी वाढला; सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

गेल्या तीन दशकांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान किंवा मंत्री बनले नाही. काँग्रेसच्या ऐक्यासाठी गांधी कुटुंब महत्त्वाचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे अशी अपेक्षाही गेहलोत यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()