काँग्रेसनं अखेर करुन दाखवलं; कमळ फुलता फुलता कोमजलं!

congress main.jpg
congress main.jpg
Updated on

जयपूर- राजस्थानच्या 12 जिल्ह्यातील 50 स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत 1775 वॉर्डपैकी काँग्रेसला 620, भाजपला 548, बसपाला 7, माकपला 2, आरएलपीच्या एक उमेदवारासह 595 अपक्षांनी विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने 12 जिल्ह्यातील 50 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  (43 नगरपालिका आणि 7 नगर परिषदा) सदस्यांच्या पदासाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल रविवार जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त पीएस मेहरा यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीत अपक्ष हे किंगमेकरच्या भूमिकेत असतील. 

नुकताच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजपला फक्त सिरोही, सवाई माधोपूरमध्येच स्थान मिळवता आले. तर जयपूर, जोधपूर, कोटा, बारां, दौसा, धौलपूर आणि श्रीगंगानगरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, पीएस मेहरा म्हणाले की, अध्यक्षपदासाठी सोमवारी सूचना जारी होईल. नामांकन पत्र मंगळवारी तीन वाजेपर्यंत दाखल करावे लागेल. अर्ज छाननी बुधवारी होईल. तर गुरुवारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. चिन्हाचे वाटप 17 डिसेंबर म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या निश्चित वेळेनंतर त्वरीत केले जाईल. 

अध्यक्षपदासाठी 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी मतदानानंतर त्वरीत केली जाईल. याचपद्धतीने 21 डिसेंबर रोजी उपाध्यक्षपदासाठी मतदान होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.