सीकरच्या रिंगास जिल्ह्यात राहणारे एक कुटुंब क्रूझर जीपमधून प्रवास करत होते.
राजस्थान : देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राजस्थानमधील (Rajasthan) नागौर जिल्ह्यात (Nagaur District) क्रूझर जीप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात (Cruiser Jeep and Truck Accident) झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील सुरपलिया इथं हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलं, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचंही मोठं नुकसान झालंय. रात्री उशिरा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली.
यावेळी पोलिसांनी सांगितलं की, सीकरच्या रिंगास जिल्ह्यात राहणारे एक कुटुंब क्रूझर जीपमधून प्रवास करत होते. जैसलमेरमध्ये बाबा रामदेव यांचं दर्शन घेऊन परतलेल्या जीपमध्ये चालकासह पंधरा जण होते आणि पुढं ते सालासर बालाजीच्या दर्शनासाठी जात होते. त्यानंतर खातू श्यामजींचे दर्शन घेऊन घरी परतण्याचा कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात झाला.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बर्डीफाटाजवळ हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. महामार्गावर दुभाजक नसल्यामुळं रात्री एका ट्रकनं समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या जीपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, जीपचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. यात मृतदेहांच्या हाडांचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले आहेत. या अपघातात जीपमधील फुलचंद (40), रोहिताश (25), कौशल्या (25), हेमराज (7) आणि रुक्मा (7) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.