Rajasthan Election: तिकीट कापल्याने 'खिलाडी' काँग्रेसवर नाराज, गेहलोतांवर केली आगपाखड; खर्गेंकडे दिला राजीनामा

राजस्थानमध्ये काँग्रेसची चौथी आणि पाचवी यादी आल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे.
Rajasthan Election
Rajasthan ElectionEsakal
Updated on

राजस्थानमध्ये काँग्रेसची चौथी आणि पाचवी यादी आल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे. काँग्रेसचे आमदार आणि राजस्थान अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष खिलाडी लाल बैरवा यांचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी उघडपणे बंडखोरी केली आहे. आपल्याच सरकारला कोंडीत पकडत त्यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी 25 सप्टेंबर रोजी (गेहलोत यांच्या बाजूने) राजीनामा न दिल्याने त्यांचे तिकीट रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खर्गे यांना पाठवला राजीनामा, सरकारवर उपस्थित केले सवाल

खिलाडी लाल बैरवा यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्या सरकारवरच प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, राज्यातील 20 टक्के लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जाती समाजाचा आवाज दाबला जात आहे. त्यांच्या अनेक कामांची माहिती देताना ते म्हणाले की, त्यांच्याकडून राबविल्या जाणाऱ्या मोहिमा बंद केल्या जात आहेत.

Rajasthan Election
Rajasthan Election: सचिन पायलट यांना काँग्रेसचा झटका! ७ समर्थक आमदारांना डच्चू; विधानसभेची चौथी, पाचवी यादी जाहीर

राजीनामा दिल्यानंतर एएनआयशी बोलताना बसेरी मतदारसंघाचे आमदार बैराव यांनी त्यांचे तिकीट रद्द होण्यासाठी पायलट आणि गेहलोत यांच्यातील संघर्षाला जबाबदार धरले. 25 सप्टेंबर रोजी राजीनामा देणाऱ्यांपैकी ते नव्हते त्यामुळे त्यांचे तिकीट कापले, असे खिलाडी लाल बैरवा यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पायलट यांच्याकडे कमान देण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादिवशी जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी राजीनाम्याची खेळी खेळून हे होऊ दिले नाही. तर बैरवा हा पायलट ग्रुपचा नेता मानला जातो.

Rajasthan Election
Ram Mandir Ayodhya : संगमरवर अन् सोन्याच्या आठ फूटांच्या सिंहासनावर बसणार प्रभू श्रीराम, 'या' दिवशी पोहोचणार अयोध्येत

तिकीट रद्द करण्याचे कारण काय होते?

खिलाडी लाल बैरवा म्हणाले, '25 सप्टेंबरला राजीनामा देणाऱ्यांमध्ये आम्ही नव्हतो. आम्ही हायकमांडसोबत होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतो, त्याचे बक्षीस आम्हाला मिळाले. त्याची संपूर्ण हकीकत मी नंतर पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. खिलाडी लाल बैरवा यांनी सांगितले की, ते पक्षावर नाराज नाही, पण जे काही घडत आहे त्याबद्दल हायकमांडकडे तक्रार करणार आहे.

Rajasthan Election
BJP : 'या' प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग नसेल, तर राजीनामा देईन; भाजप आमदाराचं मोठं विधान, अमित शहांची घेणार भेट

सचिन पायलटच्या समर्थक गटाचा नेता असल्याने तिकीट रद्द केले होते का? या प्रश्नावर ते म्हणाले, 'कदाचित, पण अन्य काही समर्थक नेत्यांना तिकीट मिळाले आहे. मी खरे बोलतो हा माझा दोष आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बैरवा यांनी कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.