Rajasthan Election : कन्हैयालाल यांची हत्या यूपीत झाली असती तर..; योगी आदित्यनाथ यांचा कोणाला इशारा?

काँग्रेसच्या लोकांनी इतिहासाला कलंकित करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
Rajasthan Election Yogi Adityanath
Rajasthan Election Yogi Adityanathesakal
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्‍मीरमधील दहशतवादाला चाप बसविण्याचे काम केले.

अलवर : ‘आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की कन्हैयालाल (Kanhaiya Lal Murder Case) यांची हत्या कशी झाली आणि तुम्हाला तेही माहीत आहे की हा प्रकार उत्तर प्रदेशात घडला असता तर काय झाले असते?’, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गर्भित इशारा दिला.

निवडणूक प्रचाराला वेग आलेला असताना भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलवर जिल्ह्यात तिजारा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Rajasthan Election Yogi Adityanath
Government Schools : आता राज्यातील सर्व सरकारी शाळांना मिळणार मोफत वीज, पिण्याचं पाणी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘राजस्थानला स्वत:चा गौरवशाली इतिहास आहे. मात्र काँग्रेसच्या लोकांनी या इतिहासाला कलंकित करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. काँग्रेसच्या लोकांनी देशाला काश्‍मीरसारखा प्रश्‍न दिला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्‍मीरमधील दहशतवादाला चाप बसविण्याचे काम केले. ज्या राज्यात भाजपचे डबल इंजिनचे सरकार आहे, तेथे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.

Rajasthan Election Yogi Adityanath
Karnataka Politics : काँग्रेस हायकमांडनं 'हा' विषय घेतला गांभीर्यानं, सुरजेवालांनी थेट आमदार, मंत्र्यांनाच धरलं धारेवर

तालिबानच्या मानसिकतेवर उपचार करण्यासाठी बजरंगबलीची गदा पुरेशी आहे. तालिबानची मानसिकता चिरडून टाकण्याचे काम इस्राईलकडून कशा रीतीने केले जात आहे, हे आपण पाहात आहात, असेही आदित्यनाथ म्हणाले. राजस्थानला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. लांगुलचालनाचे राजकारण थांबवायला हवे. कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला पाच लाख आणि गायींची तस्करी करणाऱ्यांना २०-२० लाख रुपये का दिले? असा सवालही त्यांनी सभेत बोलताना उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.