Rajasthan Assembly Election: 20 वर्षांची परंपरा मोडणार? राजस्थानमध्ये कमळ की पंजा...Exit Poll चा अंदाज काय

Rajasthan Exit Poll
Rajasthan Exit Poll
Updated on

Rajasthan Exit Poll : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यासाठी चार राज्यांत मतदान झाले आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. तेलंगणामध्ये आज मतदान पूर्ण होणार आहे. यानंतर तुम्ही एक्झिट पोल समोर आले आहेत. राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोल राजस्थानमध्ये कमळ येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

न्यूज 18 च्या सर्व्हेनुसार भाजप राजस्थानमध्ये 111 जागा जिंकू शकते. याशिवाय काँग्रेसला 74 जागेवर विजय मिळवता येईल. इतरांना 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राजस्थानमध्ये राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. राज्यातील 200 पैकी 199 विधानसभा मतदारसंघात 51,000 हून अधिक मतदान केंद्रांवर मतदान झाले. राजस्थानच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एक परंपरा सुरू आहे. इथे दर 5 वर्षांनी सत्ताबदल होतो, पण यावेळी जनता ही प्रथा बदलते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला 71 ते 91 जागा मिळू शकतात. भाजपला 94 ते 114 मते मिळण्याचा अंदाज आहे. यावेळीही बसपाला ५ जागा मिळू शकतात. इतरांना 9 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पोल स्ट्रॅटच्या सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. तेथे भाजपला 100 ते 110 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळू शकतात. इतरांना 5 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही ९ च्या सर्व्हेनुसार पाच राज्यांमध्ये भाजपला झटका बसणार आहे.

Rajasthan Exit Poll
Telangana Assembly Elections: कोण कुणाची बी टीम? सत्तेत येण्यासाठी कुणाची होणार युती? जाणून घ्या तेलंगणाची चौरंगी लढत

इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्येही भाजपला राजस्थानमध्ये आघाडी मिळाल्याचे दिसून आले आहे. भाजपला 110 ते 110 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे.

'जन की बात' एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपला 100-122 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 62 ते 85 जागा मिळाल्या आहेत. इतरांना 14-15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Rajasthan Exit Poll
Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं उधळणार गुलाल?; स्पष्ट बहुमताचे संकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.