पंजाब नंतर राजस्थान? पण अशोक गेहलोत यांच्यासोबत १०० पेक्षा जास्त आमदार

"काँग्रेसने कॅप्टनना भरपूर काही दिले. पंजाबमधल्या काँग्रेस आमदारांना नेतृत्वबदल हवा होता. लोकशाही मार्गाने पंजाबमध्ये नेतृत्व बदल झाला"
sachin pilot ashok gehlot
sachin pilot ashok gehlot
Updated on

चंदीगड: पंजाबमध्ये (punjab) सत्तेवर असलेल्या काँग्रेसने (congress) नेतृत्वबदल केल्यानंतर आता राजस्थानमध्येही (Rajasthan) नेतृत्वबदल होऊ शकतो. अशोक गेहलोतांच्या (Ashok Gehlot) जागी सचिन पायलट (sachin pilot) यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या तर्क-वितर्कांना महसूल मंत्री हरीश चौधरी यांनी पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे. "राजस्थान आणि पंजाबमधील राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी असून त्याची तुलना होऊ शकत नाही" असे हरीश चौधरी यांनी म्हटले आहे.

"पंजाबमध्ये आमदारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची साथ सोडली. पण राजस्थानात १०० पेक्षा जास्त आमदार अशोक गेहलोत यांच्यासोबत आहेत" असे हरीश चौधरी म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून निरीक्षक म्हणून हरीश चौधरी पंजाबमध्ये गेले होते.

sachin pilot ashok gehlot
बॉडी बिल्डर मनोज पाटील प्रकरण, अभिनेता साहिल खानला दिलासा

अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "काँग्रेसने कॅप्टनना भरपूर काही दिले. पंजाबमधल्या काँग्रेस आमदारांना नेतृत्वबदल हवा होता. लोकशाही मार्गाने पंजाबमध्ये नेतृत्व बदल झाला" कॅप्टन अमरिंदर यांना अपमानित केल्याच्या मुद्दयावर ते म्हणाले की, "अपमान कसा झाला, बदल घडवण्याची आमदारांची मागणी होती. काँग्रेसमध्ये प्रत्येक व्यक्ती आपले विचार मांडण्यासाठी मुक्त आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()