नवी दिल्ली- जयपूरच्या विश्वकर्मा भागामध्ये दिल्लीच्या राजेंद्रनगरसारखीच घटना घडली आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेला बेसमेंटमध्ये पाणी साचले होते. यामध्ये बुडून तीन लोकांना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल डिफेन्स आणि SDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु करण्यात आले. एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरला पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बिल्डिंगचा भाग कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे जयपूर सध्या ठप्प पडले आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जयपूरमधील परिस्थितीचे भयानक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी दिल्लीच्या राजेंद्रनगरमध्ये राव IAS कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरलं होतं. पाणी बेसमेंटमध्ये पूर्ण भरलं होतं त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला होता. यामुळे दिल्लीकरांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहेत. अशीच कथा जयपूरची देखील आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरलं. यातून बाहेर पडता न आल्यामुळे तिघांचा मृत्यू झालाय.
मुसळधार पावसाचा परिणाम जयपूरच्या रेल्वे आणि विमान सेवेवर देखील झाला आहे. जयपूर जंक्सन गांधी नगर स्टेशन पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. प्रवाशांना ताटकळत उभा राहावे लागत आहे. जयपूर विमानतळात देखील पाणी शिरलं आहे. प्रवाशांनी याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जयपूरमधील SMS हॉस्पिटल देखील पावसाच्या पाण्यामुळे प्रभावित झाले आहेत. एकंदर स्थिती गंभीर बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.