Kolihan Mine: खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Hindustan Copper Limited : राजस्थानमधील नीमकथाना येथील हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्ट मशीनची दोरी तुटल्याने 14 जण खाणीत अडकल्याची माहिती मिळाली आहे.
Rajasthan Jhunjhunu 14 people are feared trapped after a lift fell in Kolihan mine
Rajasthan Jhunjhunu 14 people are feared trapped after a lift fell in Kolihan mineesakal
Updated on

Hindustan Copper Limited

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील कोलिहान खाणीत लिफ्ट कोसळल्याने किमान 14 लोक अडकल्याची भीती आहे . मंगळवारी रात्री उशिरा हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL's) च्या तांब्याच्या खाणीत ही घटना घडली असून बचाव कार्य सुरू आहे.

घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

भाजप आमदार धर्मपाल गुर्जर म्हणाले, "मी निवडणूक प्रचारासाठी हरियाणात गेलो होतो, पण जेव्हा मला ही माहिती मिळाली तेव्हा मी ताबडतोब येथे आलो. मी सर्वांना बोलावून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. मी येथे एसडीएमला बोलावले आहे. बचाव पथक कार्यरत आहे. आणि 6-7 रुग्णवाहिका येथे उभ्या आहेत... संपूर्ण प्रशासन अलर्टवर आहे, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, निश्चितपणे सर्वजण सुखरूप बाहेर येतील."

Rajasthan Jhunjhunu 14 people are feared trapped after a lift fell in Kolihan mine
Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

साखळी तुटल्याने लिफ्ट खाणीत 1875 फूट खाली पडली. मागच्या 9 तासांपासून बचावकार्य सुरू आहे, मात्र प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. आत अडकलेल्या अधिकाऱ्यांसाठी औषधे आणि अन्नाची पाकिटे पाठवली. 13 मेपासून खाणींमध्ये तपासणी सुरू होती.

Rajasthan Jhunjhunu 14 people are feared trapped after a lift fell in Kolihan mine
Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.