Rajashthan :कोटा फॅक्टरी की 'सुसाईड फॅक्टरी'; आणखी एका विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

Rajasthan Kota factory :कोटामध्ये यावर्षी एकूण १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.
Sucide Case
Sucide Caseesakal
Updated on

Rajashthan Kota News:

नवी दिल्ली- देशभरातील पालक आपल्या पाल्याला चांगल्यातले चांगले शिक्षण मिळावे यासाठी कोटा येथे पाठवत असतात. कोटा शिक्षणासाठी प्रसिद्ध झालेलं शहर आहे. पण, येथील अभ्यास आणि तणाव सर्वच विद्यार्थ्यांना झेपतो असं नाही. कोटा येथे आणखी एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील विद्यार्थी मनजोत छाबडा याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात आता आणखी एका विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं आहे. मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

17 वर्षाचा भार्गव मिश्रा चार महिन्यांपूर्वी बिहारच्या चंपारण्यमधून इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परिक्षा कोचिंगसाठी कोटा येथे आला होता. भार्गव कोटाच्या महावीर नगरमध्ये पीजीमध्ये राहत होता. तो एका खासगी क्लासेसमध्ये जेईई परिक्षेची तयारी करण्यासाठी आला होता. भार्गवच्या वडिलांनी त्याला जेव्हा फोन लावला तेव्हा त्याने फोन उचलला नाही. खूप वेळ होऊनही भार्गव फोन उचलत नव्हता किंवा परत फोन करत नव्हता. शेवटी वडिलांनी घरमालकाला फोन लावला. घरमालकाने जेव्हा रुमचा दरवाजा वाजवला तेव्हा कोणीही दार उघडले नाही. खिडकीमधून पाहिल्यास भार्गव मिश्रा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

Sucide Case
Parliament Session: लोकसभेत राजनाथ सिंह नाराज, समोरची खुर्ची सोडून गेले मागे

घरमालकाने पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना रुममध्ये सुसाईड नोट आढळलेली नाही. चार महिन्याअगोदरच भार्गव कोटा येथे आला होता. भार्गव याचा मृतदेह स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोलिस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. पण, शैक्षणिक तणावातून भार्गव मिश्राने आत्महत्या केली असल्याचं बोललं जातंय.

Sucide Case
Sakal Podcast : बारसूप्रकरणी फडणवीसांचा आरोप ते राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती

कोटा येथे आत्महत्या का वाढताहेत?

मेडिकल आणि इंजिनिअर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची फॅक्टरी म्हणून कोटा शहराला ओळखलं जातं. देशभरातील विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअर व्हायचं स्वप्न घेऊन कोटा येथे येत असतात. कुटुंबियांकडून असलेलं दडपण, ऐकटेपणा, अवघड परीक्षा यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येते. नैराशातून अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. यावर्षी कोटा येथे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. कोटामध्ये यावर्षी एकूण १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. जवळपास २ लाख विद्यार्थी कोटा येथे कोचिंग घेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.