Assembly Election Result 2023: 4 विधानसभा निवडणुकामंध्ये काँग्रेस 3 राज्यात पिछाडीवर आहे. हा काँग्रेसाठी मोठा धक्का मानला जाते. काँग्रेस नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसचा निकाल लोकसभा निवडणुकीसाठी देखील चिंतेचा मानला जात आहे. दरम्यान काँग्रेस नेत्यांनी आता काँग्रेसच्या पराजयाची कारणे सांगितले आहेत.
सनातनच्या विरोधाचा हा परिणाम असल्याचे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी न्यूज-18 शी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. काँग्रेसचा सुपडा साफ झाला की नाही हे आता सांगणे कठीण आहे. मात्र काँग्रेसची गाडी ज्या दिशेने गेली तिकडे फक्त अंधार आहे. काँग्रेस पक्ष जो महात्मा गांधी यांच्या रस्त्यावर चालत होता. त्या पक्षाला मार्क्सच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नाचा हा परिणाम असल्याचे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)
सनातनला विरोध करून भारतात राजकारण होऊ शकत नाही. सनातनच्या विनाशाच्या घोषणा करणाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे. याला महात्मा गांधींच्या मार्गावर चालणारा पक्ष म्हणता येणार नाही. महात्मा गांधी हे खरे धर्मनिरपेक्ष होते, असे देखील आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.
2018 मध्ये काँग्रेसने तिन्ही राज्यात सरकार स्थापन केले तेव्हा पक्षाने त्यांना स्टार प्रचारक बनवले होते, पण यावेळी त्यांना प्रचारक बनवले गेले नाही, यावर ते म्हणाले, 'पहिल्यांदाच, काँग्रेसने हिंदू संत केले, त्यांना स्टार प्रचारक बनवले, काँग्रेसच्या रणनीतीकारांची काही मजबुरी असावी की त्यांना यावेळी बनवले गेले नाही. काँग्रेसमध्ये काही विशिष्ट प्रकारचे लोक आहेत ज्यांना रामाचे नाव घेऊ नये असे वाटते. सनातन बद्दल बोलू नये. जो सनातनला शिव्या देतो त्याला सर्वात मोठा नेता बनवले जाते.
काँग्रेसमध्ये काही विशिष्ट प्रकारचे लोक आहेत ज्यांना रामाचे नाव घेऊ नये असे वाटते. सनातन बद्दल बोलू नये. जो सनातनला शिव्या देतो त्याला सर्वात मोठा नेता बनवले जाते, असा आरोप देखील आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींना दोष दिला नाही ते म्हणाले, राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली, पण जनतेने त्यांना आशीर्वाद दिला नाही. राहुल गांधीजींनी जमेल ते केले. भारत जोडो यात्रेत ते हजारो किलोमीटर चालले. राहुल गांधींना दोष देणे योग्य नाही. माणूस कष्ट करू शकतो, फळ देणे हे देवाचे काम आहे. लोकशाहीत जनता देव असते. आमची प्रार्थना किंवा राहुल गांधींची सेवा जनतेने स्वीकारली नसेल, तर त्यांना दोष देणे योग्य नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केल्याचा मुद्दा देखील आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "सनातनला विरोध करू नका असे मी दर आठवड्याला सांगत होतो. भाजपशी लढा पण रामाशी लढू नका, असे मी नेहमी सांगत होतो. तसेच ते जेंव्हा मोदींवर टीका करायचे तेव्हा मी सांगायचो, पंतप्रधान हा फक्त भाजपचा नाही तर भारताचा आहे. पंतप्रधानांचा अपमान करू नका. पंतप्रधानांचा आदर करा. पंतप्रधान कोणताही असला तरी जनतेला पंतप्रधानांचा अपमान सहन होत नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.