राजस्थानात कोरोना मार्गदर्शक तत्त्वे जाहीर ; 'असे' आहेत निर्बंध

राजस्थान सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Ashok Gehlot
Ashok Gehlot Esakal
Updated on

देशातील वाढत्या कोरोना (Corona)आणि ओमिक्रॉन (Omicron)संख्येमुळे राजस्थानात (Rajasthan)पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ९ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय लग्न समारंभाला १०० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. गेहलोत सरकारने सर्वपक्षीय बैठकीत एकमत घेऊन नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. काल हरियाणा आणि पंजाब (Haryana and Punjab) सरकारने कोरोना निर्बंध कडक करुन शाळा बंद ठेवल्या आहेत. तर आज राजस्थान सरकारने देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने खबरदारी घेत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जयपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा ९ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाशी चर्चा करून निर्णय घेता येणार आहेत.

राजस्थानात असे आहेत निर्बंध

विमानाने, रेल्वेने किंवा बसने प्रवास करून राजस्थानात येणाऱ्या प्रवाशांचे लसीकरणाच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र आणि प्रवास सुरू झाल्यापासून ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देणे बंधनकार आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्यांना विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल आणि अहवाल येईपर्यंत ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. शाळा आणि कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. एखाद्या पालकाला मुलाला शाळेत पाठवायचे नसेल, तर शाळा प्रशासन त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. शाळांना ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय द्यावे लागतील.

३१ जानेवारीपर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांवरती असेल. १०० पेक्षा जास्त लोकांना लग्न-कार्याला उपस्थित राहता येणार नाही. विवाहाची पूर्व सूचना DOIT पोर्टलवर किंवा आणि १८१ या नंबरवर देणे बंधनकारक असेल. लग्नसोहळ्यात नियमांचे उल्लंघन केल्यास सात दिवसांसाठी हाॅल किंवा गार्डन सील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याचबरोबर मंदिरात फुले,हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई आहे. अंत्यविधीसाठी २० लोकांची परवानगी असेल. सार्वजनिक कार्यक्रम, खेळ, सभा, रॅली, यात्रेच्या ठिकाणी १०० पेक्षा अधिक लोकांना सहभाग घेता येणार नाही. शिवाय या सर्व कार्यक्रमांची सूचना DOIT अॅप आणि १८१ नंबरवर देणे बंधनकारक असेल. दुकानं,जिम, माॅल, रेस्टाॅरेंटमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत. शिवाय अशा सूचनांचे बोर्ड लावणे बंधनकारक राहिल. ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, १० वर्षाच्या आतील मुलांना घरी राहणे बंधनकार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()