Rajasthan : सचिन पायलटांना रोखण्यासाठी गेहलोतांचा मास्टर प्लान; CM पदाच्या शर्यतीत आता 'ही' 5 नावं

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी CM गेहलोत सर्व फिल्डिंग लावत आहेत.
Ashok Gehlot vs Sachin Pilot
Ashok Gehlot vs Sachin Pilotesakal
Updated on
Summary

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी CM गेहलोत सर्व फिल्डिंग लावत आहेत.

Rajasthan Politics : देशाच्या राजकारणात काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election 2022) पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळं अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेकांची नावं चर्चेत आली आहेत. सध्या या शर्यतीत अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि शशी थरूर (Shashi Tharur) यांची नावं आघाडीवर आहेत.

दरम्यान, अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असली, तरी आताही त्यांचा राजस्थानबद्दलचा मोह सुटत नाहीय. ते सचिन पायलट (Sachin Pilot) यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी सर्व फिल्डिंग लावत आहेत. गेहलोत यांनी त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून सोनिया गांधींना विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी (CP Joshi) यांचं नाव सुचविल्याची चर्चा आहे. याशिवाय, त्यांच्याकडं अशी अनेक नावं आहेत, त्याद्वारे ते पायलट यांचा पत्ता कट करु शकतात.

Ashok Gehlot vs Sachin Pilot
Congress : गांधी घराण्यातील अध्यक्ष नको असं राहुल गांधींच म्हणालेत; गेहलोतांचा मोठा गौप्यस्फोट

धारीवालांची राज्याच्या राजकारणात चांगली पकड

मुख्यमंत्री पदासाठी रघु शर्मा आणि बीडी कल्ला यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरुय. हे दोन्ही नेते सीपी जोशींप्रमाणं ब्राह्मण समाजातून येतात. शिवाय, गेहलोत गटातील प्रभावशाली नेत्यांपैकी आहेत. या नेत्यांशिवाय शांतीलाल धारीवाल यांचंही नाव चर्चेत आहे. ते वैश समाजातून येतात. शांतीलाल धारीवाल हे अशोक गेहलोत यांच्या जवळचे असून ते प्रभावशाली नेते आहेत. धारीवाल यांची राज्याच्या राजकारणात चांगली पकड आहे.

Ashok Gehlot vs Sachin Pilot
RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना 'राष्ट्रपिता' म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?

सचिन पायलट गटही परसादींना विरोध करू शकणार नाही

तसेच राजस्थान काँग्रेसमध्ये परसादी लाल मीणा यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे, राजस्थानमध्ये 13 टक्के लोकसंख्या असलेला एसटी समाज हा दलितांनंतरचा दुसरा सर्वात मोठा मतदार गट आहे. एवढंच नाही तर या एसटी प्रवर्गात सर्वाधिक संख्या ही मीणा बिरादरींची असून, ती राज्यात 7 टक्के आहे. अशा स्थितीत सामाजिक समतोल जपत अशोक गेहलोत परसादी लाल मीना यांच्या नावाचाही प्रस्ताव देऊ शकतात. हायकमांडलाही यावर आक्षेप नसेल. याशिवाय सचिन पायलट गटही त्यांना विरोध करू शकणार नाही. तसं केल्यास एसटी समाजातून नाराजी निर्माण होण्याचा धोका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()