भाजपला दणका; आमदारानं केलं काँग्रेसला Cross Voting, सुभाष चंद्रांचा खेळ बिघडणार!

Rajya Sabha Election
Rajya Sabha Electionesakal
Updated on
Summary

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात पुन्हा एकदा फूट पडल्याचं समोर आलंय.

जयपूर : राज्यात सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha election) पार्श्वभूमीवर भाजपात पुन्हा एकदा फूट पडल्याचं समोर आलंय. इथं एकेकाळी वसुंधरा राजेंच्या (Vasundhara Raje) ताफ्यातील आमदार समजल्या जाणाऱ्या शोभाराणी कुशवाह (Shobharani Kushwaha) यांनी क्रॉस व्होट केल्यानं भाजपच्या (BJP) गोटात खळबळ उडालीय. शोभराणी यांनी भाजपच्या घनश्याम तिवारींऐवजी काँग्रेसच्या (Congress) प्रमोद तिवारींना मतदान केल्याचं सांगण्यात येतंय.

इकडं निवडणुकीत शोभाराणी यांचं मत नाकारलं गेल्यानं चंद्रा यांना यावेळी राज्यसभेची जागाही काढता येणार नाही, हेही दिसून येतंय. उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांनी भाजपच्या पाठिंब्यानं राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली होती. चंद्रा याआधी हरियाणातून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.

Rajya Sabha Election
संजय राऊत कोण, मला माहित नाही; राऊतांचं नाव घेताच उदयनराजे का संतापले?

मिळलेल्या माहितीनुसार, शोभाराणी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. त्या बराच काळ पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागीही होत नव्हत्या. शोभाराणी या भरतपूर विभागातील एकमेव आमदार आहेत. पूर्व राजस्थानमध्ये काँग्रेसच्या वर्चस्वानंतर शोभराणी या एकमेव आमदार राहिल्या आहेत. ज्यांनी संपूर्ण भरतपूर विभागात भाजपसाठी धोलपूरमधून एक जागा काढून घेतली होती. पती बीएल कुशवाह धोलपूरमधील एका हत्येप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर शोभराणी या पोटनिवडणूक जिंकून राजस्थान विधानसभेत पोहोचल्या. पती बीएल कुशवाह हे बसपचे आमदार होते.

Rajya Sabha Election
विरोधी पक्षाचा 'बिगर काँग्रेसी' राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असणार?

शोभाराणी पक्षावर का आहेत नाराज?

मिळालेल्या माहितीनुसार, शोभराणी यांनी पुढील विधानसभा निवडणूक बारी विधानसभा मतदारसंघातून (Bari Assembly constituency) निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा होती. गिरराज मलिंगा हे काँग्रेसचे आमदार म्हणून येथील लोकप्रतिनिधी आहेत. शोभाराणी यांना बारीमधून निवडणूक लढवायची नव्हती. यावरून त्या पक्षावर नाराज होत्या. शोभाराणी पक्षापासून दुरावल्याच्या अनेक चर्चाही रंगल्या आहेत. त्याचवेळी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर त्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय. तर, दुसरीकडं बांसवाडामधील गढी येथील भाजपचे आमदार कैलाशचंद मीणा यांनीही मतदानात चूक केल्याचं वृत्त आहे, त्यामुळं त्यांचं मत फेटाळलं जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.