CV Ananda Bose : राजभवनातील पोलिसांमुळे आपल्या सुरक्षेला धोका; राज्यपाल बोस यांचा खळबळजनक दावा

पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस आणि राज्य सरकारमधील संघर्ष नवीन वळणावर पोचला आहे.
CV Ananda Bose
CV Ananda Bosesakal
Updated on

कोलकता - पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस आणि राज्य सरकारमधील संघर्ष नवीन वळणावर पोचला आहे. राजभवनात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सध्याच्या पोलिस पथकामुळेच आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल बोस यांनी नुकतेच राजभवनमधील पोलिसांना परिसर रिकामा करण्याचा आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही पोलिस राजभवनमधून गेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘पीटीआय’शी बोलताना ते म्हणाले,की राजभवनाचे प्रभारी पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकामुळे माझ्या वैयक्तिक सुरक्षेला धोका असल्याचे वाटत असून त्यामागे अनेक कारणे आहेत. राजभवनमध्ये या पोलिस पथकामुळे असुरक्षित वाटत असल्याचे मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही कळविले आहे.

मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. राजभवनमधील पोलिस माझ्यावर तसेच माझ्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवत आहेत. राज्य सरकारमधील नेत्यांच्या छुप्या पाठिंब्यावरुन पोलिस असे वागत असून हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे, असेही त्यांनी सांगितले.

राजभवनच्या सूत्रांच्या माहितीनुसार, राजभवनमध्ये सुरक्षेसाठी असलेले पोलिस सातत्याने आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार बोस यांनी केली आहे. राजभवनाबाहेरील शक्तीच्या प्रभावातून पोलिस आपल्यावर लक्ष ठेवत असल्याचीही राज्यपालांची भावना आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडेच गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस खात्यातील सर्वांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय काहीही घडू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. यापूर्वीही नोव्हेंबर २०२३ मध्ये राजभवनात पोलिसांकडूनच गुप्तहेरी केली जात असल्याचा आरोप राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी केला होता.

राजभवनच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या व पथकाच्या गैरकृत्याची माहिती माझ्याकडून असून या माहितीची पडताळणीही केली आहे. राजभवनात सध्या असलेल्या काही पोलिसांची प.बंगालच्या सचिवालयात नियुक्ती करण्यात आली होती. ते कुणाचेतरी हस्तक असल्यासारखे काम करत आहेत. सध्यातरी कुणाचे नाव घेण्याची इच्छा नाही.

- सी.व्ही. आनंद बोस, राज्यपाल, प. बंगाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.