rajiv gandhi assassination case perarivalan says after release order there is no need for capital punishment
rajiv gandhi assassination case perarivalan says after release order there is no need for capital punishment

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटकेच्या आदेशानंतर प्रतिक्रिया, म्हणाला..

Published on

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्येप्रकरणी ए जी पेरारीवलन (AG Perarivalan) यांची सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर पेरारिवलन यांने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांने फाशीच्या शिक्षेची गरज नाही, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे म्हटले आहे. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात पेरारिवलन याला सुरुवातीला चेन्नई येथील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

पेरारिवलन, त्याची आई अर्पुथम्मल आणि नातेवाईकांसह पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझा ठाम विश्वास आहे की, फाशीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांनी हे सांगितले आहे आणि अशी अनेक उदाहरणे आहेत, आपण सगळेच माणूस आहेत, असे म्हटले आहे. सुटका झाल्यानंतर कसे वाटले आणि त्याचे पुढिल योजना काय आहेत असे विचारले असता, ए जी पेरारिवलन म्हणाला की, मी नुकताच बाहेर आलो आहे. कायदेशीर लढाईला 31 वर्षे झाली आहेत. मला श्वास घ्यायचा आहे.. मला थोडा वेळ द्या, असेही त्याने सांगितले.

rajiv gandhi assassination case perarivalan says after release order there is no need for capital punishment
राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका होणार; SCमध्ये सुनावणी पूर्ण

राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ए जी पेरारिवलनला दोषी ठरवले आणि त्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेखाली 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढावा लागला. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कलम 142 अंतर्गत आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत पेरारिवलन यांना सोडण्याचे आदेश दिले. खंडपीठाने सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाने संबंधित चर्चेच्या आधारे निर्णय घेतला असून कलम 142 चा वापर करत, दोषींला सोडणे योग्य ठरेल, असा निर्णय दिला. राज्यघटनेचे कलम 142 सर्वोच्च न्यायालयाला विशेषाधिकार देते, ज्या अंतर्गत संबंधित प्रकरणामध्ये अन्य कोणताही कायदा लागू होत नाही तोपर्यंत त्याचा निर्णय सर्वोच्च मानला जातो.

rajiv gandhi assassination case perarivalan says after release order there is no need for capital punishment
महागाईने सामान्य बेजार, इंडियन ऑईलने मिळवला रेकॉर्डब्रेक 24 हजार कोटींचा नफा

मार्चमध्ये मिळाला होता जामीन

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी ए.जी पेरारिवलन याला न्यायालयाने जामीन दिला होता. न्यायालयाने शिक्षा आणि पॅरोलची शिक्षा भोगत असताना त्यांच्या वागणुकीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर 9 मार्च रोजी जामीन मंजूर केला. 'मल्टी-डिसिप्लिनरी मॉनिटरिंग एजन्सी' (MDMA) द्वारे तपास पूर्ण होईपर्यंत 47 वर्षीय पेरारिवलनच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

rajiv gandhi assassination case perarivalan says after release order there is no need for capital punishment
हार्दीक पटेल भाजपमध्ये जाणार?, दोन बड्या नेत्यांच्या संपर्कात

1991 मध्ये झाली होती राजीव गांधींची हत्या

21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान एका महिला आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला बॉम्बने उडवले ज्यामध्ये राजीव गांधी मारले गेले. धनू असे या महिलेचे नाव आहे. मे 1999 च्या आदेशात न्यायालयाने पेरारिवलन, मुरुगन, संथन आणि नलिनी या चार दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर

18 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन, संथन आणि मुरुगन यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. केंद्र सरकारने दया याचिका निकाली काढण्यास 11 वर्षांचा विलंब केल्यामुळे न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()