Rajiv Gandhi Love Story : इंग्रजीचे धडे घ्यायला गेले अन् थेट प्रेमातच पडले! पण...

सोनियाजींचे वडील शेवटपर्यत नाहीच म्हणत होते, पण..
Rajiv Gandhi Love Story
Rajiv Gandhi Love Storyesakal
Updated on

Rajiv Gandhi Love Story : आज राजीव गांधी यांचा जन्मदिवस. राजीव गांधी यांची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. जानेवारी १९६४ ही तारीख त्यांच्या आयुष्यात फार खास होती. या दिवशी ते कँब्रिज कॉलेजमध्ये सोनिया यांना भेटले होते. या दोघांच्या मैत्रिचं रूपांतर नंतर प्रेमात झालं. आता प्रश्न होता तो एवढाच की त्यांच्या नात्यांबद्दल घरच्यांना कसं सांगावं. सोनिया यांना विश्वास होता की त्यांची आई नात्याला नकार देणार नाही मात्र वडील देतील. तर दुसरीकडे राजीव गांधींना त्यांची आई हे नातं स्वीकारेल अशी आशा होती. मात्र हे तेवढं सोपंही नव्हतं.

राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ मध्ये झाला होता. विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या राजीव गांधीची प्रेम कहाणी इथेच सुरू झाली. त्यांच्या आणि सोनिया यांच्या नात्याला सगळ्यांनी स्वीकारलं मात्र सोनिया गांधींच्या वडिलांचा शेवटपर्यंत नकारच होता.

राजीव गांधींनी २१ वर्षाचे असताना १९६५ मध्ये कँब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. याच वर्षी कँब्रिज युनिव्हर्सिटीमधून लेक्नॉस कुक स्कूलमधून इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इटलीमधून एंटोनिया अलबिना मायनो म्हणजेच सोनिया गांधीही आल्या होत्या. सोनिया यांचे वडील बिल्डर होते. आपल्या मुलींनी त्यांना आवडतं ते सगळं करावं अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी सोनिया यांना कँब्रिजला शिकण्यासाठी पाठवले. कँब्रिजच्या युनिव्हर्सिटीचे सोनिया आणि राजीव या दोघांचेही कँपस वेगवेगळे होते. सोनिया कॉलेजमध्ये असतना उकळलेल्या भाज्या, ऑमलेट आणि ब्रेडसह टोमॅटो सॉस खाऊन कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीच्या कँपसमध्ये जेवायच्या.

एके दिवशी सोनिया गांधी त्यांच्या मैत्रिणीसोबत याच रेस्टॉरंटमध्ये बसल्या होत्या तेवढ्यात त्यांचा मित्र क्रिस्टियन वान स्टेगालिट्ज राजीव गांधींसह इथे पोहोचले. यानंतर राजीव गांधींनी लाजतच अगदी सोनिया गाधींशी हँड शेक केला. दोघांमध्ये संभाषण नव्हतेच. राजीव गांधी आणि मित्र क्रिस्टियन एका दुसऱ्या टेबलर बसून जेवू लागले. मात्र राजीव गांधींचे लक्ष त्यांच्या जेवणाकडे कमी आणि सोनिया गांधींकडे जास्त होते. तेव्हाच क्रिस्टियन म्हणला," तुला सोनिया आवडते काय?" राजीव म्हणालेत, "हो, पण आधी माझा तिच्याशी परिचय तर करून दे."

जेवियर मोरो सोनिया गांधींबाबत सांगताना लिहीतात, की याच दिवशी राजीव गांधींनी सोनिया यांना त्यांचा लाइफ पार्टनर बनवण्याचे ठरवले होते. त्याच दिवशी त्यांनी सगळे दुपारी ऐली शहर फिरायला जाण्याचे ठरवले. यावेळी सोनिया यांच्याजवळ नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे त्याही तयार झाल्यात.

जेव्हा सगळे फिरायला गेले तेव्हा सोनिया आणि राजीव यांच्यात फार संवाद झाला नाही कारण राजीव गांधींना इंग्रजी भाषा अगदीच बरोबर येत नव्हती. तर सोनिया यासुद्धा इंग्रजी नुकत्याच शिकायला आल्या होत्या. राजीव गांधींनी त्यावेळी सोनिया यांचा हात पकडला होता. सोनिया जेव्हा परत त्यांच्या खोलीवर पोहोचल्या तेव्हा संपूर्ण दिवस तो क्षण त्यांच्या डोक्यात घर करून बसला होता. त्या वारंवार स्वत:ला हे प्रेम असू शकतं का असा प्रश्न विचारत होत्या. मग पहिल्याच भेटीत असं कुठल्याही मुलावर प्रेम होणं शक्य आहे काय? असंही उत्तर स्वत:लाच देत होत्या.

एके दिवशी राजीव गांधींनी सोनिया यांना फ्लॉ डू मॉल मधील चांगल्या नाइट क्लबमध्ये नेण्याचे ठरवले. मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी त्यांचा मित्र क्रिस्टियनच्या लाउंजवर सोनिया यांना नेले. बऱ्याच वेळ इथे त्यांच्या गप्पा रंगल्या. घरी परतताना प्रचंड पाऊस येत होता. त्यामुळे सोनिया यांना घरापर्यंत सोडायला ते खुद्द गेले होते. याच वेळी त्यांनी सोनिया यांना प्रपोज केलं होतं. आणि सोनिया यांनीही हे प्रपोजल हसतमुखाने स्वीकार केलं.

राजीव गांधींनी त्यांचं प्रेमप्रकरण पत्र पाठवून आई इंदिरा यांना कळवलं

राजीव गांधी यांनी १९६५ मध्ये इंदिरा गांधी यांना पत्र लिहील. पत्रात त्यांनी लिहीलं होतं," आई, इथे असलेल्या मुलींबद्दल तुम्ही कायम मला विचारत असता आणि मी आतापर्यंत कोणाला भेटलो हेही विचारता. मी तेच सांगण्यासाठी हे पत्र लिहीतो आहे. एका मुलीशी माझी ओळख झाली, तिला अजून मी विचारलेलं नाही पण ही तिच मुलगी आहे जिच्याशी मला लग्न करायचं आहे." यावर इंदिरा गांधींनी उत्तर पाठवलेल्या उत्तरात लिहीलं होतं की," आयुष्यात ज्या पहिल्या मुलीला तू भेटलास तिच तुझ्यासाठी योग्य असावी हे गरजेचं नाही." (Birth Anniversary)

आईचं हे उत्तर वाचून राजीव गांधी चिंतेत पडले होते. त्यांनी दुसऱ्यांना आईला पत्र लिहीलं तेव्हा मी लवकरच लंडनला येईल तेव्हा त्या मुलीची भेट करून दे असं त्या म्हणाल्या. हे राजीव यांनी सोनिया यांना कळवताच त्या चिंतेत पडल्या. मात्र राजीव यांचं प्रेम काही कमी झालं नाही. याच काळात सोनिया यांनी बिजनेस फेस्टिव्हलमध्ये दुभाषकाची नोकरी मिळाली. आता चिंता होती ती फक्त त्यांच्या वडिलांना राजीवबाबत कसं सांगावं याची.

यासाठी त्या तासंतास आरशासमोर उभ्या राहून बोलण्याचा सराव करू लागल्या. त्यांच्या घरच्यांना कळले तेव्हा त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. राजीव गांधी हे सोनियापेक्षा वयाने लहान होते आणि ते सोनिया यांच्या कुटुंबियांसाठी विदेशातले होते.

जेव्हा राजीव गांधी खुद्द सोनिया यांच्या राहत्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले....

राजीव गांधी सोनिया यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे आई-वडील जेवण करत होते. राजीव म्हणाले, "मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे." हे ऐकताच सोनिया गांधीही चकीत होऊन बघतच राहिल्या. सोनिया यांच्या आईचा जेवता जेवता हात क्षणार्धासाठी थांबला तर त्यांचे वडील काही वेळाने बोलले आणि म्हणाले, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. पण मला माझ्या मुलीची चिंता आहे. ती भारतातल्या वातावरणात मिसळेल असं मला वाटत नाही.

मात्र सोनिया गांधींनी जेव्हा भारतात वेळ घालवला तेव्हा त्यांना भारत आवडला. बऱ्याच विरोधानंतर अखेर या दोघांचं लग्न झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.