राजीव गांधींच्या मदतीमुळे वाजपेयींचा जीव वाचला, नेमकं काय घडलं होतं?

राजीव गांधी यांनी या मदतीबाबत इतरांना कधी सांगितले नाही.
Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayee
Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayeeesakal
Updated on

Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayee : काँग्रेस पक्षाच्या रणनीतीमुळे अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीत पराभूत झाले. मात्र या पराभवाचा अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणताही परिणाम झाला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त झाले.

त्यावर भारतात उपचार होणे शक्य नव्हते. डाॅक्टरांनी अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी वाजपेयी यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते अमेरिकेला जाऊ शकत नव्हते.(Rajiv Gandhi Help Atal Bihari Vajpayee During In His Illness)

Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayee
अटल बिहारी वाजपेयी : ‘या’ निर्णयांनी मिळाली अर्थव्यवस्थेला नवी गती

कसे तरी पंतप्रधान राजीव गांधी यांनी याविषयी माहिती मिळाली. त्यांनी एके दिवसी अटलबिहारी वाजपेयी यांनी भेटण्यास पंतप्रधान कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. वाजपेयी गेले. त्यांना राजीव गांधी म्हणाले, तुमच्या नेतृत्वाखाली भारताचे प्रतिनिधीमंडळ संयुक्त राष्ट्रसंघात पाठवले जाईल. तुमच्या अनुभवाचा फायदा सरकार घेऊ इच्छित आहे. अशा प्रकारे वाजपेयी हे अमेरिकेत गेले. तेथे त्यांना आपल्या आजारपणावर उपचारही करता येऊ शकले.

Rajiv Gandhi And Atal Bihari Vajpayee
शिंजो आबे, लिंकन, केनेडी, महात्मा गांधी, इंदिरा-राजीव.. जगाला हादरवून सोडणाऱ्या हत्या

यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी या मदतीबाबत इतरांना कधी सांगितले नाही. सर्वांना वाटले की अटलबिहारी वाजपेयी सारखा मोठा नेता आपल्या गुणवत्ता आणि पात्रतेच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघात पाठवले गेले आहे. ते भारताचे पहिले नेते होते ज्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करुन देशाची मान उंचावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.