Share Market:अदानीच्या बुडत्या कंपनीला वाचवणारे आता पतंजलीतही भागीदार, बाजारातील हे नवे प्रस्थ कोण? जाणून घ्या.

Patanjali Shares:पतंजली कंपनीची हिस्सेदारी घेत दिला आधार, या कंपनीने अडानींनाही केली होती मदत
Patanjali
Patanjali sakal
Updated on

GQG Partners invested in Patanjali:राजीव जैन हे नाव मागच्या वर्षापर्यंत जास्त चर्चेत नव्हतं.मात्र, २०२३च्या सुरुवातीला जेव्हा अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गने आपला एक शोध अहवाल प्रकाशित केला होता. त्यानंतर राजीव जैन यांचं नाव प्रकाशझोतात आलं आणि आजही चर्चेत आहे.

हिंडेनबर्गने सादर केलेल्या अहवालामुळे अडानीच्या गौतम अडानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट बघायला मिळाली, तेव्हा इन्वेस्टमेंट फर्म जीक्यूजी पार्टनर्सने (GQG Partners)अडानीच्या कंपनीमध्ये भागीदारी विकत घेत मोठा आधार दिला होता.

त्यांनी एक नव्हे तर तीनवेळा गुंतवणूक केलीये. आता राजीव जैन यांनी बाबा रामदेव यांच्या कंपनीवर विश्वास दाखवत, त्यांच्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

पतंजलीमध्ये ५.९६ % टक्क्याची भागीदारी

बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीने सोमवारी (दि.१७ जुलै)सांगितलं की जीक्यजी पार्टनर्सने १४ जुलै, २०२३ला या कंपनीचे २,१५,६४,५७१ शेअर खरेदी केले. याचा हिशोब केला तर जीक्यूजी पार्टनर्सने कंपनीमध्ये ५.९६ टक्क्याची भागीदारी विकत घेतली आहे.

या इन्वेस्टमेंट फर्मने ऑफर फॉर सेल (OFS)च्या माध्यमातून या शेअर्सची खरेदी केली आहे.राजीव जैन यांनी केलेल्या या गुंतवणूकीची बातमी जगजाहीर झाल्यावर पतंजलीच्या शेअर्सवर याचा परिणाम जाणवला आहे.(Latest Marathi News)

Patanjali
Kirit Somaiya Viral Video: 'मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही'; कथित व्हिडीओ प्रकरणी सोमय्यांची चौकशीची मागणी

२४०० कोटींची गुंतवणूक

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात पतंजली कंपनीचे शेअर हिरव्या कॅंडलस्टीकवर व्यापार करताना दिसले. शेअर मार्केट बंद होण्याच्या वेळी पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये २.४२ टक्क्यांनी वाढून १२५३वर बंद झाला. (Latest Marathi News)

या दिवसात शेअरची किंमत १२५९ रुपयांपर्यंत पोहोचली होती. एका अहवालानुसार राजीव जैन यांनी बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली फूड्स कंपनीमध्ये जवळपास २४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Patanjali
Monsoon Session : वाढीव मदतीचे निकष बदलले, शेतकऱ्यांना १४८ कोटींचा फटका

पतंजलीने दोन दिवसांसाठी दिली होती ऑफर

बाबा रामदेव यांच्या कंपनीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांसाठी आपल्या कंपनीचे शेअर्स खूप कमी किमतीमध्ये विकले होते. ही विक्री ऑफर फॉर सेलच्या अंतर्गत करण्यात आली होती. ही ऑफर १३ आणि १४ जुलैला सुरु होती.(Latest Marathi News)

या ओएएसअंतर्गत पतंजली फूड्सची प्रमोटर कंपनी पतंजली आयुर्वेदद्वारे ७ टक्के भागीदारी विकण्यात आली होती. या ऑफरमध्ये त्यांनी आपल्या कंपनीच्या शेअर्सची विक्री २२५ रुपयांच्या किमतीवर केली होती.

एका स्टॉकचा कमीत कमी भाव १००० रुपयांपर्यंत करण्यात आला होता. पतंजली फूड्सची ही ऑफर १३ जुलैला नॉन रिटेल इन्वेस्टर्ससाठी होती, तर १४ जुलैला रिटेल इन्वेस्टर्ससाठी ही ऑफर खुली करण्यात आली होती.

Patanjali
Monsoon Session : मोहोळ विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी; यशवंत माने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.