Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Rajkot TRP Game Zone Fire: टीआरपी गेम झोन सर्वात मोठा होता. आजूबाजूच्या गेम झोनपेक्षा मोठे असे अनेक खेळ येथे होते. टीआरपी गेम झोन 2020 मध्ये सुरू झाला होता.
Rajkot TRP Game Zone Fire
Rajkot TRP Game Zone Fire esakal
Updated on

Rajkot TRP Game Zone Fire:

गुजरातमधील राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. 24 मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. हा टीआरपी गेम झोन आगीच्या भक्ष्यस्थानी आला आणि काही मिनिटांतच तो 'डेथ झोन' बनला. काल (शनिवार) येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गेम झोन राखेचा ढीग झाला होता. अपघातातील मृतांची संख्या वाढत आहे. टीआरपी गेम झोन हा सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन होता. येथे 20 हून अधिक साहसी खेळ खेळले जात होते.

टीआरपी गेम झोन अनेक मुले येत असतात. अता सुट्ट्या सुरु असल्यामुळे मुलांची येथे मोठी गर्दी असते. येथे लहान मुलांसाठी डार्ट गेम टार्गेट, ज्युनियर जंपिंग, ज्युनियर बॉलिंग ॲली, सुमो रेसलिंग या खेळांचा समावेश होता. अपघाताच्या दिवशीही येथे मोठी गर्दी होती. सर्वजण खेळांचा आनंद लुटत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. काही वेळातच संपूर्ण गेम झोन आगीत भडकला. गेम झोनची भौगोलिक स्थितीही एवढ्या मोठ्या अपघाताचे प्रमुख कारण असू शकते, अशी चर्चा देखील रंगली आहे.

टीआरपी गेम झोन सर्वात मोठा होता. आजूबाजूच्या गेम झोनपेक्षा मोठे असे अनेक खेळ येथे होते. टीआरपी गेम झोन 2020 मध्ये सुरू झाला होता. हे 2 एकर जागेवर बांधले गेले. गेम झोन एका मोठ्या टिन शेडखाली बांधण्यात आला होता. उष्णतेपासून वाचण्यासाठी त्यात मोठे वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले होते. या दुर्घटनेत टिनशेडचा काही भागही कोसळला.

फ्लाय हाईट ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये मेजर मेझ, बॉलिंग, डार्ट गेम टार्गेट, जंपिंग अशा अनेक खेळांचा समावेश होता. यातील बहुतांश क्रीडा साहित्य इलेक्ट्रीक होते. लहान मुलांची खेळणी फायबरपासून बनवली गेली आणि छतावर थर्माकोलच्या पत्र्यांचा वापर करण्यात आला. आग लागली तेव्हा या इमारतीत सर्वाधिक गर्दी होती.

Rajkot TRP Game Zone Fire
Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभाव जोशी यांनी माध्यमांना सांगितले की, गेम झोनमध्ये विजेचा भार जास्त होता. उष्ण हवामानामुळे विद्युत वायरिंगला भार हाताळता आला नसल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.

गेम झोनमध्ये जनरेटर चालवण्यासाठी सुमारे दोन हजार लिटर डिझेल ठेवण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याचवेळी गो कार रेसिंगसाठी सुमारे 1500 लिटर पेट्रोलचा साठा करण्यात आला होता. या ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्याने हा अपघात भीषण झाला. काही मिनिटांतच संपूर्ण गेम झोन आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

Rajkot TRP Game Zone Fire
Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.