Rajnath Singh : राजनाथसिंह यांची सियाचीनला भेट

तैनात जवानांशी सिंह यांनी संवाद साधला. त्यांना मिठाई वाटून मनोधैर्य वाढविले.
Rajnath Singh : राजनाथसिंह यांची सियाचीनला भेट
राजनाथसिंहesakal
Updated on

नवी दिल्ली ः जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी भेट दिली. या भागातील भारताच्या लष्करी तयारीचा आढावा त्यांनी घेतला. काराकोम पर्वतरांगेत २० हजार फूट उंचीवरील सियाचीन ग्लेशियरवर मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात जवानांना संरक्षणमंत्र्यांनी वंदन केले.

Rajnath Singh : राजनाथसिंह यांची सियाचीनला भेट
Dhule News : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये गावठी कट्टे, तलवारी हस्तगत; 72 गुन्हेगारांची झाडाझडती

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशात भारतीय लष्कर सज्जतेला गेल्या आठवड्यात ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राजनाथसिंह आज सियाचीनला आले होते. त्यांच्याबरोबर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हेही होते. सियाचीनमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे तैनात जवानांशी सिंह यांनी संवाद साधला. त्यांना मिठाई वाटून मनोधैर्य वाढविले.

राजनाथसिंह म्हणाले, की सियाचीनमधील ‘ऑपरेशन मेघदूत’चे यश सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. जगातील सर्वांत उंचावरील या युद्धभूमीवर आपल्या सैन्याने जो पराक्रम केला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. जवानांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘देशांच्या सीमांच्या सुरक्षेसाठी तुम्ही सर्व काही पणाला लावण्यास कायम तत्पर असतात. तुमचे देशप्रेम आम्हा सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.