लोकेंद्र सिंह यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री होते आणि ते चंद्रशेखर यांचे विश्वासू सहकारीही होते.
Karni Sena Lokendra Kalvi Passed Away : राजस्थानमधील (Rajasthan) श्री राजपूत करणी सेनेचे (Shri Rajput Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalvi) यांचं रात्री उशिरा एसएमएस रुग्णालयात निधन झालं.
कालवी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. जून 2022 पासून त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकमुळं दीर्घकाळ रुग्णालयात उपचार सुरू होते. कालवी यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) 14 मार्चला दुपारी 2.15 वाजता त्यांच्या मूळ नागौर जिल्ह्यातील कालवी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जोधा अकबर या चित्रपटाविरोधात प्रचार करून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मध्य राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील कालवी गावात जन्मलेल्या लोकेंद्र कालवी यांना राजकीय वारसा मिळाला. त्यांचे वडील कल्याणसिंह कालवी हे अल्पकाळ राज्य आणि केंद्रात मंत्री राहिले आहेत.
लोकेंद्र कालवी यांनी नागौरमधून लोकसभेसाठी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1998 मध्ये कालवी यांनी भाजपचे उमेदवार म्हणून बारमेरमधून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये कालवी यांनी काही राजपूत नेत्यांसह सामाजिक न्याय मंचची स्थापना केली आणि उच्च जातींच्या आरक्षणासाठी मोहीम सुरू केली.
लोकेंद्र सिंह यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री होते आणि ते चंद्रशेखर यांचे विश्वासू सहकारीही होते. लोकेंद्रसिंह यांनी अजमेरच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.