Congress: गेहलोतांनी राजीनामा दिला तरी पायलटांसाठी CM पद मिळवणं सोपं नाही

sachin pilot Shol Gehlot
sachin pilot Shol GehlotSakal
Updated on

जयपूर : सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची तयारी चालू असून काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची लढत होणार हे जवळपास नक्की आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसच्या घराण्याबाहेरील अध्यक्ष होणार हे नक्की झालं असून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचं ठरवलं आहे. तर 'एक व्यक्ती एक पद' या भूमिकेवर राहुल गांधी ठाम असल्यामुळे अशोक गेहलोत यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे.

(Rajsthan Conngress Politics Latest Updates)

दरम्यान, येत्या १७ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचं नाव चर्चेत असतानाच त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर गेहलोत यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे. पण सचिन पायलट यांना गेहलोत यांच्या जागी मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.

sachin pilot Shol Gehlot
भारताला 2047 पर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट; आरोपीचा मोठा खुलासा

नेमकं काय आहेत अडचणी ?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहेत पण आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून सचिन पायलट यांच्या नावाला त्यांचा विरोध आहे. कारण त्यांना काँग्रेस अध्यक्षाबरोबर मुख्यमंत्रिपदही आपल्याकडे रहावे अशी अपेक्षा होती पण 'एक व्यक्ती एक पद' या योजनेमुळे त्यांची गोची झाली आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलण्यास त्यांचा विरोध होता.

आमदारांचा विरोध

गेहलोतांनी विरोध केल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असली तरी त्यांना आमदारांचा पाठिंबा मिळत नाही. कारण गेहलोतांनी निमंत्रण दिल्यावर सगळे आमदार त्यांच्या घरी गेले होते. त्यामुळे काही आमदार पायलट यांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. तर गेहलोत यांना समर्थन करणाऱ्या आमदारांचा पायलट यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास विरोध आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्यासमोर बरेच आव्हानं उभे आहेत.

sachin pilot Shol Gehlot
डान्सवाले हंस; हंसाच्या जोडप्याचा तळ्याकाठचा डान्स एकदम ओक्के, Video Viral

पायलट यांनी एकदा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती

राजस्थानध्ये गेहलोत यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांना पायलट यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही कारण त्यांनी एकदा आपल्या पक्षाशी गद्दारी केली होती. त्याचबरोबर त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेले काही आमदार आहेत त्यांचा पायलट यांच्या नावाला विरोध आहे.

जातीय समीकरणे

राजस्थानमध्ये गुर्जर आणि मीणा समाजातील मतदार जास्त आहे. गुर्जर समुदाय प्रामुख्याने भाजपला तर मीणा समाज काँग्रेसला मतदान करतो. तर पायलट मुख्यमंत्री झाले तर गुर्जर समाजाचे राजकीय महत्त्व वाढेल आणि काँग्रेसचा प्रभाव कमी होईल त्यामुळे काँग्रेस पायलट यांना मुख्यमंत्री करून असा धोका पत्करणार का याकडे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.