Rajsthan MP Election: मध्य प्रदेशात भाजपला झटका, राजस्थानातही धक्कादायक कल; सर्व्हे काय सांगतो पाहा?

येत्या आठवडा भरात या दोन राज्यांसह छत्तीसगड आणि तेलंगाणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे.
BJP and Congress preparing Lok sabha and Maharashtra elections politics
BJP and Congress preparing Lok sabha and Maharashtra elections politicsesakal
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. कारण येत्या आठवडाभरातच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाच महिन्यांनी लोकसभेची निवडणूकही जाहीर होईल.

पण सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थानात जर आजच्या घडीला निवडणुका झाल्यातर कोण सत्तेत येईल? याचा कल एका निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. यामध्ये मध्य प्रदेशात भाजपला धक्का बसेल तर राजस्थानात काठावर लढाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टाईम्स नाऊ-नवभारत या माध्यम संस्थेनं हे निवडणूक पूर्व सर्व्हेक्षण केलं आहे. (Rajsthan Madhya Pradesh Election Shocking trend in both states See what the survey says)

मध्य प्रदेशात कोण बाजी मारणार?

या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशात जर आजच्या घडीला निवडणूक झाली तर एकूण २३० जागांपैकी भाजपला १०२-११० जागा, काँग्रेसला ११८-१२८ जागा, अन्य पक्षांना ०-२ जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच ११५ हा बहुमताचा आकडा काँग्रेस सहज गाठू शकेल. त्यामुळं मध्य प्रदेशात सध्याचं शिवराज सिंह चौहान सरकार जाऊन काँग्रेसचं कमलनाथ यांचं सरकार सत्तेत येऊ शकतं. कमलनाथ हेच सध्या मध्य प्रदेशात काँग्रेसचा चेहरा आहेत. (Latest Marathi News)

मतांची टक्केवारी किती असेल?

मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी भाजपला ४२.८० टक्के मतं मिळू शकतात. तर काँग्रेसला ४३.८० टक्के मतदान होऊ शकतं. तसेच अन्य पक्षांच्या पारड्यात १३.४० टक्के मतं जाऊ शकतात, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

राजस्थानात कोण बाजी मारेल?

राजस्थानात एकूण जागा २०० आहेत. यांपैकी भाजपला ९५-१०५, काँग्रेसला ९१-१०१ तर अन्य पक्षांना ३-६ जागा मिळू शकतात. त्यामुळं राजस्थानात भाजप आणि काँग्रेसमध्ये काटें की टक्कर होऊ शकते. राजस्थानत सध्या काँग्रेसचं अशोक गेहलोत यांचं सरकार आहे.

मतांची टक्केवारी किती असेल?

राजस्थानात २०० जागांसाठी भाजपला ४२.८० टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसच्या पारड्यात ४२.२० टक्के मतं तर अन्य पक्षांकडं १५ टक्के मतं जाऊ शकतात, असा अंदाजही या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. त्यामुळं मतांच्या टक्केवारीत भाजप आणि काँग्रेसला घासून मतदान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.