India Alliance : राजू शेट्टी विरोधकांच्या बैठकीला जाणार? स्वत:च खुलासा करत म्हणाले, मोदी सरकारला विरोध करण्यासाठी..

'महाविकास आघाडीबाबत मला आलेला अनुभव फारसा चांगला नाही'
Raju Shetti India Alliance
Raju Shetti India Allianceesakal
Updated on
Summary

या बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दूरध्वनी केला होता.

नवी दिल्ली : येत्या 31 ऑगस्ट व एक सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले आहे.

Raju Shetti India Alliance
Kolhapur : मुश्रीफांनी इशारा देताच फडणवीसांची 'सुळकूड योजने'त एन्ट्री; वाद चिघळणार की पाणीप्रश्न सुटणार?

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, "या बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दूरध्वनी केला होता. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, अशी विनंती केली.

परंतु, महाविकास आघाडीबाबत मला आलेला अनुभव फारसा चांगला नाही. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी 'इंडिया' आघाडीत जाणं मला आवश्यक वाटत नाही, असं ते म्हणाले.

Raju Shetti India Alliance
Uday Samant Latest News : गुवाहाटीला जावून आल्यानंतर फक्त माझं खातं बदललं, मी बदललो नाही; असं का म्हणाले उद्योगमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार व अजित पवार यांच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "या दोन्ही नेत्यांमध्ये नातेसंबंध असले तरी राजकारणातील भूमिकेत मात्र स्पष्टता आली पाहिजे. ही स्पष्टता अद्याप तरी दिसत नाही. त्यामुळे शरद पवार यांनी या संदर्भात काही कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()