लज्जास्पद! एक MP जगदीप धनखडांची मिमिक्री करतोय अन् राहुल गांधी VIDEO बनवताहेत; उपराष्ट्रपती नाराज

हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेले खासदार संसद परिसरात आंदोलन करत आहेत. यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकर यांची मिमिक्री केली.
Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar criticised Trinamool MP Kalyan Banerjee mimicry of him filmed by Rahul Gandhi
Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar criticised Trinamool MP Kalyan Banerjee mimicry of him filmed by Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली- हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेले खासदार संसद परिसरात आंदोलन करत आहेत. यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकर यांची मिमिक्री केली. यावरुन उपराष्ट्रपती भडकल्याचं पाहायलं मिळालं. (Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar criticised Trinamool MP Kalyan Banerjee mimicry of him which was filmed by Congress MP Rahul Gandhi)

उपराष्ट्रपतींनी या प्रकाराला लज्जास्पद म्हटलं आहे. हा सर्व प्रकार अस्वीकार्य आहे की एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्याचा व्हिडिओ बनवत आहे. राज्यसभा अध्यक्ष म्हणाले की, पातळी सोडण्याची काही मर्यादा असते. मी एक व्हिडिओ पाहिला. त्यात एक खासदार माझी नक्कल करत आहेत. दुसरा त्याचा व्हिडिओ करत आहे. त्यांना सदबुद्धी देवो. काही ठिकाणांना तरी सोडा.

Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar criticised Trinamool MP Kalyan Banerjee mimicry of him filmed by Rahul Gandhi
MP Suspended: लोकसभेच्या खासदारांना निलंबित करण्याचं सत्र सुरूच, महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह ४९ खासदार निलंबित

राज्यसभेतील कामकाजादरम्यान जगदीप धनखड यांनी केलेल्या कृतीची नक्कल कल्याण बॅनर्जी यांनी करुन दाखवली. यावेळी त्यांच्या शेजारी अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. कल्याण बॅनर्जी यांच्या कृतीला इतर खासदार दाद देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही या प्रकाराचा निषेध केलाय. कल्याण बॅनर्जी यांनी संसदेची प्रतिष्ठा आणि पदाचा अपमान केलाय, असं ते म्हणाले. दरम्यान, लोकसभेतून आज ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याविरोधात खासदार संसदेच्या परिसरात आंदोलन करत आहेत.

Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar criticised Trinamool MP Kalyan Banerjee mimicry of him filmed by Rahul Gandhi
MLA Disqualification : ...तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल; सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने मांडला अत्यंत महत्वाचा मुद्दा

संसदेतील सुरक्षा भेद प्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत यावरुन निवेदन द्यावं अशी विरोधकांची मागणी आहे. पण, असं होत नसल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर निलंबनांचं शस्त्र पुढे करण्यात आलं आहे. सोमवारी ९२ खासदारांचं निलंबन झालं होतं. आज आणखी ४९ खासदारांचे निलंबन झालंय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()