Rajya Sabha Elections BJP Candidates: राज्यसभेसाठी भाजपकडून १४ उमेदवारांची घोषणा; कोणाला मिळाली संधी?

Rajya Sabha Elections BJP Candidates: राज्यसभेच्या १४ जागांसाठी भाजपने रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
Rajya Sabha Elections BJP Candidates
Rajya Sabha Elections BJP CandidatesEsakal
Updated on

नवी दिल्ली: राज्यसभेच्या १४ जागांसाठी भाजपने रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील सात, बिहारमधील दोन तर छत्तीसगड, हरियाना, कर्नाटक, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.(Rajya Sabha Elections BJP Candidates)

उत्तर प्रदेशातून ज्या नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे, त्यात डॉ. सुधांशू त्रिवेदी, आर. पी. एन. सिंह, साधना सिंह, तेजवीरसिंह चौधरी, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन यांचा समावेश आहे. बिहारमधून डॉ. धर्मशीला गुप्ता आणि डॉ. भीम सिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर कर्नाटकमधून नारायण भांडगे, छत्तीसगडमधून देवेंद्र प्रताप सिंह, हरियानातून सुभाष बराला, उत्तराखंडमधून महेंद्र भट आणि प. बंगालमधून सामिक भट्टाचार्य यांना संधी देण्यात आली आहे.

Rajya Sabha Elections BJP Candidates
Rajya Sabha Election : शरद पवार गटामुळे राज्यसभा निवडणुकीचे गणित बदलले

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ तारखेला मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक दहा जागा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा जागांचा समावेश आहे

Rajya Sabha Elections BJP Candidates
PM Modi in Rajya Sabha: "आमचा कर, आमची लस ही कसली भाषा? मोदी कडाडले, रोख कोणाकडे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.