नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. राज्यसभेच्या सदस्यांनी (Rajya Sabha) एक मिनीट उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Lata Mangeshkar) राज्यसभेचे सभापती एम व्यंकया नायडू (M Venkaiah Naidu) यांनी गायिका आणि सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. कामकाज सुरु होण्याआधीच त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यानंतर एका तासासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. (Rajya Sabha Pays Tribute to Lata Mangeshkar)
यावेळी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी म्हटलंय की, लता मंगेशकरांच्या जाण्यामुळे देशाचं अतोनात नुकसान झालं असून एक चांगली पार्श्वगायिका देशाने गमावली आहे. त्यांच्या रुपाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एक दयाळू व्यक्ती आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे जणू एका युगाचा अस्त झाला आहे. यामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.