राज्यसभेत उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, 'मुलांनो माफ करा'

Naidu-in-Rajya-Sabha
Naidu-in-Rajya-Sabha
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरून आज, संसदेत गोंधळ झाला. लोकसभेत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी गोंधळ घातला तर, राज्यसभेतही तसाच गोंधळ सुरू होता. राज्यसभेत सभापती वेंकय्या नायडू यांनी आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कामकाज चालू देण्याची विनंती वारंवार केली. पण, त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. दुदैवाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राज्यसभेत कामकाज होऊ शकले नाही. 

काय म्हणाले, उपराष्ट्रपती?
राज्यसभेत व्यंकय्या नायडू म्हणाले की, आमचे वर्तन सारा देश पहातो आहे. आज प्रेक्षक गॅलरीत विद्यार्थीही आले आहेत. या भावी पिढीसमोर आम्ही संसदेची प्रतिमा कशी उभी करत आहोत, असे सांगून नायडू यांनी, मुलांनो आम्हाला माफ करा, असे उद्गार काढले. काँग्रेस सदस्यांना उद्देशून त्यांनी, - तुम्ही त्यांना (भाजप), ते तुम्हाला व मी तुम्हा साऱ्यांना काहीही शिकवू शकत नाही हीच येथील खरी समस्या आहे, असाही शेरा मारला. संसदेत म्हणजेच लोकसभेत सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनीच गोंधळात सहभाग घेताना राहूल गांधींकडून माफीची मागणी केली. मात्र यापूर्वी याच संसदेतील महिला खासदार रेणुका चौधरी यांना रामायणातील विकट हास्य करणाऱया राक्षशिणीची उपमा देणाऱया सत्तारूढ नेतृत्वाबद्दल भाजप मौनात गेला आहे. राहूल गांधी यांनी झारखंडच्या एका प्रचारसभे मेक इन इंडियाचा डांगोरा पिटताना देश सध्या रेप इन इंडिया बनला आहे असे निरीक्षण नोंदवले होते.

काय घडले राज्यसभेत?
राज्यसभेत भाजपने राष्ट्रपतीनियुक्त सोनल मानसिंह यांना पुढे करून सकाळी अकराला गोंधळास सुरवात केली. मानसिंह यांनी म्हटले की राहूल गांधी यांचे उद्गार समस्त महिलांचा अपमान आहे. मी कलाकार आहे पण त्याआधी एक महिला आहे.,एका मोठ्या पदावरील राजकीय नेत्याने महिलांबाबत व बलात्कारांबाबत इतक्या खालच्या पातळीवर येऊन जाहीर वक्तव्य देणे शोभत नाही. परिणामी गांधी यांनी देशातील महिलांची माफी मागावी. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरोज पांडे, रूपा गांगुली तसेच जदयूच्या कहेकशा परवीन व अण्णाद्रमुकच्या विजुला सत्यनाथ आदी खासदारही उभ्या राहिल्या. पांडे यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे शून्य प्रहराचे कामकाज तहकूब करावे लागले. यामुद्यावरून भाजपने आपल्या महिला आघाडीतर्फे देशभरात उद्यापासून उग्र आंदोलन करण्याचे ठरविले आहे.

प्रश्नोत्तर तासात कांग्रेसने नागरिकत्व कायद्यातील घआतक तरतुदींमुळे आगडोंब उसळलेल्या आसामसह ईशान्य भारताचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी सरकारने संसदेत निवेदन करावे कारण लष्कर हे साऱया समस्यांवरील उत्तर नाही असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले. या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक व मुख्यमंत्र्यांची बैठक तातडीने बोलावण्याची मागणीही कांग्रेसने केली. तत्पूर्वी आनंद शर्मा यांनीही काही गरज नसताना मोदी सरकारने हे विधेयक आणून सीमावर्ती आसामासह ईशान्य भारतातील शआंतता नष्ट केली आहे असे स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.