Sanjay Singh Suspended: आपचे खासदार संजय सिंह संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित, काय आहे प्रकरण?

पियुष गोयल यांच्या तक्रारीवरून संजय सिंह यांच्यावर कारवाई
Sanjay Singh Suspended
Sanjay Singh SuspendedEsakal
Updated on

आपचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना संसदेच्या कामकाजातून निलंबित करण्यात आलं आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत असल्यामुळे राज्यसभेतुन निलंबीत करण्यात आली आहे. उर्वरीत पावसाळी अधिवेशन काळासाठी संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. (Sanjay Singh suspended News)

मणिपूरच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत असल्यामुळे राज्यसभेतुन आपचे खासदार संजय सिंह यांचे निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सिंह याचं निलंबन केलं आहे. उर्वरीत पावसाळी अधिवेशन काळासाठी संजय सिंह यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

वारंवार सांगूनही संजय सिंह यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली आहे. खासदार पियुष गोयल म्हणाले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, तरीही कारवाईत अडथळा आणला जात आहे.

Sanjay Singh Suspended
Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर अत्याचार; जमावाने केली निर्घृण हत्या

संजय सिंह यांच्या निलंबनावर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, 'हे दुर्दैवी आहे. आमची कायदेशीर टीम या प्रकरणाची चौकशी करेल. संजय सिंह यांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांचे नेते राज्यसभेच्या अध्यक्षांची भेट घेत आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी एक वाजता सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे.

Sanjay Singh Suspended
Manipur Violence: मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया; म्हणाले, PM मोदींनी दखल...

सभागृहात गोंधळ का?

मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर विरोधक सातत्याने पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेची मागणी करत आहेत. सोबतच या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांची घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू आहे.

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मणिपूरमध्ये एनडीए सरकारविरोधात आघाडी केली आहे. त्याचबरोबर राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दाही भाजपने लावून धरला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास तयार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे, मात्र त्यासोबत राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील महिलांवरील अत्याचारांवरही चर्चा व्हायला हवी असंही म्हंटलं आहे.

Sanjay Singh Suspended
Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थितीवर सुरक्षा यंत्रणांची नजर, ६०००हून अधिक तक्रारी दाखल; सरकारी सूत्रांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.