मंत्री राकेश सचानवर गुन्हा कधी दाखल होणार? शिक्षेची ऑर्डर कॉपी घेऊन फरार

तक्रार मिळून २४ तास उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही
Rakesh Sachan Latest News
Rakesh Sachan Latest NewsRakesh Sachan Latest News
Updated on

Rakesh Sachan Latest News लखनौ : उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सचान (Rakesh Sachan) यांना एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. मात्र, ते कानपूर न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन पळून (Absconding) गेले. राकेश सचान कोर्टातून आदेशाची प्रत घेऊन पळून गेल्यानंतर मंत्र्यावर हात टाकण्यात पोलिस घाबरत आहे. या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी राकेश सचानविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.

कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) राकेश सचान (Rakesh Sachan) यांना कानपूर न्यायालयाने बेकायदेशीर शस्त्राप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, तक्रार मिळून २४ तास उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा तपासही पोलिसांनी अद्याप सुरू केलेला नाही. रविवारी न्यायालय बंद असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू होऊ शकला नाही, असे कानपूर पोलिसांनी म्हटले आहे.

Rakesh Sachan Latest News
Rajinikanth : रजनीकांत पुन्हा राजकारणात प्रवेश करणार का? स्पष्टच दिले उत्तर

कोर्टाकडून मिळालेल्या पत्रावर एसीपी कोतवालीला या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाईल. यानंतर न्यायालयाकडून जे काही निर्देश येतील त्याआधारे पोलिस कारवाई करतील, असे कानपूर पोलिसांनी सांगितले आहे.

राकेश सचानचे वकील कोण होते? याचा शोध घेत पोलिस वकिलाचीही चौकशी करणार आहे. पोलिसांचा तपास अनेक ठिकाणी होणार आहे. यात सीसीटीव्ही फुटेजही महत्त्वाचे ठरणार आहे. सुनावणीवेळी राकेश सचान न्यायालयात हजर होते की नाही? हेही पोलीस पाहतील. आर्म्स ॲक्ट प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राकेश सचान न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन पळून गेला होता. त्या प्रकरणात ते १० महिन्यांपासून हजर झाले नव्हते.

आमदारकी वाचवण्यासाठी मंथन

न्यायालयाच्या (Court) आदेशाची प्रत घेऊन पळून (Absconding) गेलेले राकेश सचान यांना दोषी ठरवल्यानंतर शिक्षा होणार असल्याचे मानले जात आहे. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावल्याने राकेश सचान यांची आमदारकी धोक्यात येणार आहे. अशा परिस्थितीत राकेश सचान यांच्या वकिलांच्या टीमने आता त्यांची आमदारकी वाचवण्यासाठी विचारमंथन सुरू केले आहे. याबाबत सचिनचे वकील देशातील ज्येष्ठ विधिज्ञांचे मतही घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.