भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज पून्हा एकदा मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिंघु बॉर्डरवर झालेल्या दलित तरुणाच्या हत्येच्या पार्श्वभुमिवर त्यांनी हा आरोप केलाय. या हत्येनंतर शेतकरी आंदोलनावर गंभीर आरोप करण्यात आले होते, त्यावर बोलताना, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सिंघु सीमेजवळील वातावरण खराब करण्यासाठी षडयंत्र करत असल्याचा आरोप टिकैत यांनी केलाय.
सिंघु सीमेवरील घटनेला सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी जोडू नये असं मत राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. तसंच सिंघु सीमेवर घडलेली घटना हा सरकारचा कट असल्याचा आरोप देखील त्यांनी. यामुळे सीमेवरील परिस्थिती कधीही खराब होऊ शकते अशी भिती देखील त्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, निहंग्या शीखांच्या एका समुहाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून सिंघु सीमा रिकामी करण्याची मागणी केली आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सिंघु सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी पहाटे सिंघु सीमेवर एका तरुणाचा हात आणि पाय कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.