Rahul Gandhi: आधीच करायला हवी होती, ‘भारत जोडो यात्रा’; राकेश टिकेत यांचं सूचक विधान

Rakesh Tikait
Rakesh Tikait
Updated on

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, भाजप विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. (rakesh tikait news in Marathi)

Rakesh Tikait
Pune Traffic : राजकीय पेचानंतर आदित्य ठाकरे अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत

टिकेत यांनी म्हटले की, भाजपला देशावर एकछत्री सत्ता हवी आहे. त्यामुळेच ते विरोधी पक्ष नष्ट करत आहे. यासोबतच टिकेत यांनी पीएफआयवरील बंदीबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. भाजपवर निशाणा साधताना राकेश टिकेत म्हणाले, "पीएफआयवर बंदी घालून सरकारने योग्य केले आहे. मात्र आता आणखी संस्थांवर बंदी घातली जाऊ शकते. पक्षपाती पद्धतीने ही बंदी घातली गेली असेल तर ते चुकीचे आहे.

राकेश टिकेत यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबतही विधान केलं. ते म्हणाले की, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा आधीच सुरू करायला हवी होती. यापुढे भाजपचे लोक सर्वांच्या हालचालींवर बंदी घालतील. त्यांचा विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे. यावेळी टिकेत यांनी यूपी निवडणूक भाजपने बेईमानी करून जिंकल्याचं म्हटलं.

Rakesh Tikait
Shashi Tharoor: थरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा

दरम्यान लखनऊ विमानतळाची संपूर्ण जमीन अदानीला मोफत दिली आहे. लवकरच याविरुद्ध आंदोलन सुरू करणार आहोत. तसेच साखर कारखानदारांनी कारखाना सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना उसाचे पैसे न दिल्यास जनआंदोलन उभं करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()