"व्हॅटिकन सिटी, मक्काच्या धर्तीवर करणार राम जन्मभूमीचा विकास"

विहिंपनं केलेली ही घोषणा महत्वाची मानली जात आहे.
ram mandir
ram mandirFile Source
Updated on

नवी दिल्ली : अयोध्येत तयार होत असलेल्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचा विकास व्हॅटिकन सिटी आणि मक्काच्या धर्तीवर करण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. विंहिपचे प्रमुख रविंद्र नारायण सिंह रविवारी नागपूरमध्ये बोलत होते.

ram mandir
Report : देशात रोजगारक्षम तरुणांची संख्या पन्नास टक्क्यांहून कमी!

नारायण सिंह म्हणाले, इटलीचं व्हॅटिकन शहर हे ख्रिश्चन धर्मियांचं सर्वोच्च धार्मिक स्थळ आहे. तर सौदी अरेबियात असलेल्या मक्का या मुस्लीम धर्मियांच्या सर्वोच्च धार्मिकस्थळ आहे. याच धर्तीवर भारतातील अयोध्येत साकारत असलेलं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र हे हिंदूंचं सर्वोच्च स्थळ असेल. विहिंपच्या प्रमुखांची ही घोषणा यासाठी महत्वपूर्ण आहे कारण हिंदुंच्या विविध धार्मिक स्थळांपैकी रामाचं जन्मस्थळ अयोध्येला हिंदुंचं सर्वोच्च तीर्थक्षेत्र घोषीत करत आहे.

ram mandir
पवारांना पंतप्रधानपदी पहायचंय; कोल्हेंनी सूचकपणे व्यक्त केली इच्छा

नागपूरमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी चर्चे करताना विहिंपच्या प्रमुखांनी देशात धर्मांतरासाठी विदेशी फंडिंगवर निर्बंध आणण्यासाठी मोदी सरकारचं कौतुक केलं. त्यांनी मुस्लीम समाजाला देखील अपील केलं की, त्यांनी देशाच्या सेवेसाठी हिंदुंसोबत हात मिळवावा. हिंदू विचार करतात की, त्यांचं काही बिघडत नाही. याच कारणामुळं आम्हाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांनी आरोप केला की, ख्रिश्चन मिशनरीज आदिवासी भागात धर्मांतरासाठी आदिवासी क्षेत्रात रुग्णालय आणि शाळा चालवत आहेत. हे मिशनरीज हिंदू धर्माला उखडून काढण्यासाठी पूर्ण योजनेंतर्गत काम करत आहे.

ram mandir
शरद पवार असामान्य कौशल्याचे धनी - गौतम अदानी

रविंद्र नारायण सिंह यांनी यावेळी दोन्ही भारताचे लोक जीडीपीची जास्त चिंता करत आहेत. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवा. जनकल्याण परिषद विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रात हिंदुंच्या कल्याणासाठी विविध योजना सुरु करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.